शिव आराधना करा निश्चितपणे आराधनेचे फळ मिळेल : पंडित प्रदीप मिश्रा


Worship Shiva and you will definitely get the fruits of your worship : Pandit Pradeep Mishra भुसावळ (11 मार्च 2026) : शिवाजी आराधना केल्यानंतर निश्चितपणे तुम्हाला फळ मिळेल. तुम्ही भगवान शंकराच्या पिंडीवर जल अर्पण करणे, बेलपत्र वाहणे, बेलपत्राच्या लाकडाचे त्रिपुंड टिळा पिंडीला लावणे इतकी भक्ती करा. जीवनात अशी कोणतीही कामना नाही, ती अपूर्ण राहिल. यासोबतच जगात कोणामध्ये इतके सामर्थ्य राहणार नाही की तो तुम्हाला हरवू शकेल, असे विचार पंडित प्रदीप मिश्रा यांनी येथे व्यक्त केले. भुसावळजवळील अकलूद शिवारात महाशिवपुराण कथेच्या पहिल्या दिवशी मंगळवार, 10 रोजी त्यांनी भाविकांना भगवान शंकराची महिमा वर्णन केली.

जिभेवर नियंत्रण ठेवा, अहिंसा टळेल
शिवाची प्रार्थना व आराधनेमुळे मदनासुराची जिव्हा सिद्ध झाली मात्र या सिद्धीचा दुरुपयोग झाला. सर्व देवांनी भगवान शिवाची प्रार्थना केली ही मदनासुराची जेव्हा सिद्धी परत घेण्याची विनंती केली. पण भगवंताने सिद्धी परत घेतली नाही. अखेर शिवाने बगलामुख व देवी पार्वतीने बगलामुखी अवतार घेवून मदनासूराचा संहार केला. यामुळे जिभेवर नियंत्रण आवश्यक आहे. जिभ चालली नाही तर बंदूकही चालणार नाही, यामुळे बोलण्यावर नियंत्रण ठेवा. त्यावरच नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. यामुळे अहिंसा टळेल.





तर डॉक्टरांची औषध देवाचा प्रसाद माना
पंडित प्रदीप मिश्रा म्हणाले की, डॉक्टर साक्षात शिवाचे रुप आहे. यामुळे आजारी पडल्यानंतर वा काही व्याधी झाली तर डॉक्टरांकडून उपचार करून घ्या. त्या डॉक्टरांमध्ये तुम्ही शंकराचे स्वरूप बघा. त्यांनी दिलेले औषधे भगवान शंकराचा प्रसाद आहे, असे समजून औषधोपचार घ्या. सोबत भगवान शंकराचे स्मरण करा त्यामुळे नक्कीच दुर्धर आजारही बरे होतील, असा सल्ला पं. प्रदीप मिश्रा यांनी दिला.

ज्यांच्या तोंडून अपशब्द निघत नाही तेच संत
पं. प्रदीप मिश्रा यांनी कथेच्या पहिल्याच दिवशी भक्तिमार्गाचे महत्व विषद केले. ते म्हणाले की, भारतभूमीत असे अनेक संत आहेत की त्यांनी कधी कोणाची निंदा केली नाही. ते केवळ प्रभुनामाचे नामस्मरण करतात तर काही संत असे आहेत की ते दिवसभर निंदा करुन अपशब्द वापरतात. असे लोक संतांच्या श्रेणीत येत नाही. ज्यांच्या तोंडातून कधी अपशब्द निघत नाही तेच खरे संत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !