यावल नगरपरिषदेत गुरांची समस्या सोडवण्यासाठी नागरिकांचे निवेदन
समस्या न सोडवल्यास बैल मोर्चा काढणार
यावल (11 मार्च 2026) : यावल शहरातील मोकाट गुरांची समस्या सोडवण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे नागरिकांनी नगर परिषदेकडे केली. पोलीस स्टेशन आणि तहसील कार्यालयात देखील याबाबत निवेदन दिले आहे.
रहदारीला निर्माण झाली अडचण
शहर व परिसरात फिरणार्या या मोकाट जनावरामुळे रहदारीला अडचणी निर्माण होते तसेच या मोकाट गुरांमुळे अनेक वेळा अपघाताचे देखील शक्यता निर्माण झाली आहे व काही नागरिकांना मोकाट गुरांनी मारल्याने दुखापत देखील झाली आहे. तेव्हा तातडीने समस्या सोडवली नाही तर बैलांचा मोर्चा काढण्यात येईल असा इशारा नागरिकांनी दिला आहे.




नगर परिषदेमध्ये शेतकरी डॉ.निलेश गडे, गणेश सुरडकर, समाधान वाघ, समीर खान, दीपक वाघ, अरुण कोळी सह नागरिकांनी निवेदन दिले. यात त्यांनी म्हटले आहे की, शहर व परिसरात फिरणार्या मोकाट गुरांमुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करत करावा लागत आहे. शहरांमध्ये मोकाट गुरांची संख्या भरपूर वाढलेली असून मोकाट गुरांमध्ये मोठ्या प्रमाणावर सांड आहेत.
रस्त्याने जाणार्या नागरिकांच्या मागे हे मोकाट गुरे सुटतात व त्यांच्या धडकेत अनेक जण हे जखमी देखील झाले आहे. तसेच या मोकाट गुरांमुळे रहदारीला अडचण तथा अडथळा निर्माण होतो व अपघाताची शक्यता देखील निर्माण होते. यावल शहरांमध्ये मोकाट गुरांच्या धडकेत बारी वाड्या गेल्या वर्षी एका जणांचा जीव देखील गेला आहे. व सध्या वाढलेल्या या मोकाट गुरांमुळे आता नागरिकांच्या जीवावर बेतले आहे. तेव्हा तात्काळ या मोकाट गुरांचा बंदोबस करण्यात यावा अशी मागणी निवेदन करण्यात आली आहे. सदरचे निवेदन तहसील कार्यालय तसेच पोलीस ठाण्यात देखील देण्यात आले आहे. दरम्यान आठ दिवसात मोकाट गुरांवर कारवाई झाली नाही तर नगरपरिषद व तहसील कार्यालयावर बैलांचा मोर्चा काढण्यात येईल असा इशारा संतप्त झालेल्या नागरिक शेतकर्यांनी दिला आहे.