महाशिवपुराण कथा : यावल-भुसावळदरम्यान सर्व अवजड वाहनांना प्रवेश बंद


यावल (11 मार्च 2026) : यावल तालुक्यातील पाडळसे येथे मंगळवारपासून शिवपुराण कथा सुरू झाली आहे. पंडित प्रदीप मिश्रा यांच्या उपस्थितीत होत असलेल्या या कार्यक्रमा करीता यावल शहरातुन भुसावळ कडे जाणारे सर्व अवजड वाहनांना बंदी करण्यात आली आहे.

सहा दिवस या मार्गावर केवळ दुचाकी व चारचाकी खाजगी वाहने , एसटी बससेवा या मार्गावर दिली जाणार आहे. अवजड वाहन धारकांनी भुसावळ जाण्या करीता या मार्गावर सहा दिवस येवू नये, अशा सूचना देण्यात आल्या आहे.





पाडळसे येथे मंगळवार, 10 ते 16 मार्च दरम्यान पंडित प्रदीप मिश्रा यांच्या उपस्थितीत शिवपुराण कथा सुरू झाली आहे. या कथेच्या कार्यक्रमात जाणार्‍या भाविक-भक्तांची गर्दी पाहता यावल भुसावळ मार्गावर अवजड वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली. माल वाहतुकीसह विविध मोठी वाहने खाजगी प्रवासी वाहतुकीची वाहने यांना बंदी करण्यात आली आहे.

याकरीता यावल शहरातील भुसावळ टी पॉइंन्ट वर यावल पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरिीक्षक सुनील मोर, पोलिस उपनिरीक्षक एम.जे.शेख सह कर्मचार्‍यांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे व सहा दिवस या मार्गावर अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली. भुसावळ मार्गावर केवळ यावल बसस्थानकावरून बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !