सांगवी खुर्द येथे मागील भांडणाच्या कारणावरून एकावर चाकू हल्ला


One stabbed in Sangvi Khurd over past dispute यावल (12 मार्च 2026) : यावल तालुक्यातील सांगवी खुर्द या गावात ग्रामपंचायत कार्यालयासमोरील मोकळ्या जागेवर मागील भांडणाच्या कारणावरून वाद झाला आणि या वादातून एका 28 वर्षीय तरुणावर चौघांनी हल्ला चढवला. ही घटना मंगळवारी घडली. या प्रकरणी यावल पोलिसात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

काय आहे प्रकरण ?
सांगवी खुर्द गावात ग्रामपंचायत कार्यालय असून त्या समोरील समोरील मोकळ्या जागेवर मागील भांडणाच्या कारणावरून सतीश प्रभाकर धनगर (28) या तरुणाला लखन सुनील कोळी, सुनील रामदास कोळी, मंगलाबाई सुनील कोळी व सागर सुनील कोळी या चौघांनी शिविगाळ करून मारहाण केली.





यावेळी लखन कोळी याने चाकूने वार करीत जबर दुखापत केली. या घटनेत पोटाच्या डाव्या बाजूस व डाव्या मांडीवर दुखापत झाली. या प्रकरणी यावल पोलिसांनी प्रभाकर धनगर यांच्या फिर्यादीवरून चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार उमेश सानप करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !