वरणगाव भूमिगत गटार प्रकल्प मंजुरीसाठी डीएमए यांची नगराध्यक्ष सुनील काळेंनी घेतली भेट
Mayor Sunil Kale meets DMA for approval of Varangaon underground sewer project वरणगाव (12 मार्च 2026) : वरणगाव शहराचा 82 कोटींचा भूमिगत गटार प्रकल्प प्रशासकीय मान्यतेसाठीवर पाठविण्यात यावा साठी मंत्री गिरीष महाजन यांच्या सूचनेनुसार वरणगावचे लोकनियुक्त नगराध्यक्ष सुनील काळे यांनी संकलक तथा आयुक्त नगरपरिषद संचालनालय, नवी मुंबई बेलापूर येथे डीएमए राधाकृष्णन यांची भेट घेतली. वरणगाव पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्णत्वास येत असल्न्याने काम पूर्ण झाल्यानंतर भूमिगत गटार योजनेचे काम होणार नाही व रस्ते सुद्धा वारंवार खोदल्यामुळे शासनाच्या निधीचा अपव्यय होवू नये यासाठी मंत्री गिरीष महाजन यांची भेट घेऊन मंत्री महाजन यांनी डीएमए यांना प्रस्ताव मंजुरीसाठी पुढे पाठवा अश्या सूचना दिल्या.
वस्तूस्थिती आणली निदर्शनास
लोकनियुक्त नगराध्यक्ष सुनील काळे यांनी तातडीने नवी मुंबई येथील बेलापूर येथे नगरपरिषद संचलनयात जाऊन डीएमए यांची भेट घेतली व वस्तूस्थिती सांगितली. प्रस्तावात अनेक त्रृटी असल्याने पूर्ण करण्यात आल्या व प्रशासकीय मंजुरीसाठी प्रस्ताव पुढे पाठविण्यात आला. भूमिगत गटार प्रकल्प वरणगाव शहरात मंजूर होत नाही तोंपर्यंत पूर्ण वेळ या योजनेसाठी पूर्ण ताकदीने घरावर तुळशीपत्र ठेवून योजना मंजुरीसाठी जोरदार प्रयत्न करणार असल्याचे लोकनियुक्त नगराध्यक्ष सुनील काळे यांनी सांगितले.




भूमिगत गटार प्रकल्प मंजुरीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांची सकाळी भेट घेतल्यानंतर राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या माध्यमातून भूमिगत गटार प्रकल्पासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले. यावेळी सोबत नगरसेवक नाना चौधरी, भाजपा शहराध्यक्ष सुनील माळी, जनसेवक कुंदन माळी, आकाश निमकर उपस्थित होते. यावेळी डीएमए राधाकृष्णन यांची भेट झाल्यावर उपायुक्त संजय काकडे एस.एल.शर्मा उपस्थित होते.