ईराण युद्धाचा परिणाम : डॉलरच्या तुलनेत रुपया निचांकी पातळीवर


Iran war aftermath : Rupee hits lowest level against dollar नवी दिल्ली (12 मार्च 2026) : इराण युद्धामुळं पश्चिम आशियामध्ये निर्माण झालेल्या तणावानंतर गुरुवारी डॉलरच्या तुलनेत रुपयात मोठी घसरण नोंदवली गेली. याशिवाय शेअर बाजारातील घसरणीमुळंही रुपयावर दबाव वाढल्याचे दिसून आले.

रुपया 92.32 पर्यंत घसरला
बुधवारी रुपया डॉलरच्या तुलनेत 92.01 वर बंद झाला तर गुरुवारी तो आणखी घसरणीसह 92.25 वर उघडला. त्यानंतर घसरण सुरूच राहिली आणि एका टप्प्यावर 92.35 प्रति डॉलरपर्यंत रुपया घसरला. गुरुवारी रुपया 0.3 टक्क्यांनी घसरून 92.3575 या पातळीवर पोहोचला. याआधीच्या 92.3475 या विक्रमी नीचांकी पातळीचाही हा स्तर पार करण्यात आला.





आरबीआयचा हस्तक्षेप
रुपयाची घसरण अधिक वाढू नये म्हणून भारतीय रिझर्व्ह बँकेनं (ठइख) बाजारात हस्तक्षेप केल्याने काही प्रमाणात घसरण थांबवण्यात मदत झाली. सहा प्रमुख चलनांच्या तुलनेत डॉलरची ताकद दर्शवणारा डॉलर इंडेक्स 0.24 टक्क्यांच्या वाढीसह 99.47 वर पोहोचला.

पश्चिम आशियामधील तणावामुळं कच्च्या तेलाच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. गुरुवारी ब्रेंट क्रूडचा दर पुन्हा 100 डॉलर प्रति बॅरलच्या वर गेला. इराणनं इशारा देत जगानं 200 डॉलर प्रति बॅरल तेलासाठी तयार राहावं, असं म्हटलं आहे.

रुपया घसरल्यास काय परिणाम?
रुपयातील घसरण कायम राहिल्यास भारतीय अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होऊ शकतो.

इलेक्ट्रॉनिक्स, कच्चं तेल आणि इतर आयात वस्तू महाग होण्याची शक्यता

परदेशात शिक्षण घेणं अधिक खर्चिक होऊ शकतं

माल वाहतूक खर्च वाढल्यामुळं अन्नधान्य आणि इतर वस्तूंचे दर वाढू शकतात

परकीय गुंतवणूकदार पैसे काढल्यास निफ्टी आणि सेन्सेक्सवर दबाव वाढू शकतो


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !