भुसावळ पालिकेची आज सर्वसाधारण सभा : सभेकडे शहरवासीयांचे लक्ष

तहकूब सभेत 341 विषयांवर होणार चर्चा ; गणपूर्ती आवश्यक


Bhusawal Municipal Council Holds General Meeting Today : City Residents’ Attention Focused on the Meeting भुसावळ (17 मार्च 2026) : भुसावळ पालिकेची 13 मार्च रोजी तहकूब झालेली सर्वसाधारण सभा मंगळवार, 17 रोजी दुपारी चार वाजता होत आहे. अधिनियम 1995 नुसार कोरम असाताना तहकूब झाल्याने ही सभा होण्यासाठी गणपूर्ती आवश्यक आहे.

हमरी-तुमरीनंतर सभा तहकूब
शुक्रवारी झालेल्या सभेत सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपच्या नगरसेवकांमध्ये हमरीतुमरी झाल्यानंतर सभा तहकूब करण्यात आली. आज मंगळवारी होणार्‍या सभेत पहिल्या विषययाच्या वाचनासून सभेला सुरवात होईल.





प्रत्येक विषयावर मतदानासाठी भाजप आग्रही
मंगळवारी होमान्या सभेचे कामकाज मतदान पद्धतीने चालवण्यासाठी भाजपा आग्रही आहे. प्रत्येक विषयासंदर्भात सभागृहातील सदस्यांची वैयक्तिक मते नोंदवून तो ठराव मंजूर किया रामजूर करावा, अशी भूमिका भाजपाने गतवेळी मांडल्यान मंगळवारच्या सभेतही हा मुद्दा पुन्हा समोर येणार आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !