भरधाव पिकअपने उडवल्याने दुचाकीस्वार ठार
Two-wheeler rider killed after being struck by speeding pickup truck. वरणगाव (17 मार्च 2026) : भरधाव पिकअपने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाला तर सहदुचाकीस्वार युवक गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात रविवारी रात्री आठ वाजता बोहर्डी जवळील महामार्गावर घडला. सुरेश काशीराम चोपडे असे मृताचे नाव आहे.
असा घडला अपघात
सुरेश काशीराम चोपडे हे दुचाकीने (एम.एच.39 डब्ल्यू.एस.1268) ने भुसावळकडून मुक्ताईनगरकडे जात असताना पाठीमागे संतोष गणेश थेरोकार बसले होते. बोहर्डी गावाजवळ समोरून येणार्या पिकअपने (एम.एच.19 बी.एम.17) ने धडक दिल्याने दुचाकीवरील दोघेही रस्त्यावर फेकले गेल.




अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी जखमींना वरणगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले, तेथून प्रकृती गंभीर असल्याने त्यांना जळगाव येथील जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. तेथे दुचाकी चालक सुरेश चोपडे यांचा मृत्यू झाला. शवविच्छेदन करून मृतदेह कुटुंबीयांकडे सोपवण्यात आला तर दुसरे जखमी संतोष थेरोकार यांच्यावर उपचार सुरू आहेत. पिकअप चालक कामील तडवी (रा.सावखेडा, ता.रावेर) विरोधात तक्रार देण्यात आली आहे.