भुसावळात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सदस्य नोंदणी अभियान


Maharashtra Navnirman Sena’s Membership Registration Drive in Bhusawal भुसावळ (17 मार्च 2026) : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे सदस्य नोंदणी अभियानाचा जिल्हा उपाध्यक्ष विनोद पाठक यांच्या उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला. नाहाटा महाविद्यालयाजवळ या अभियानाला सुरूवात करण्यात आली. पक्षाचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांचे विचार तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि भुसावळ शहराच्या प्रश्नांवर सक्षमपणे लढण्यासाठी ही सदस्य नोंदणी मैलाचा दगड ठरणार आहे.

यांचे यशस्वीतेसाठी परिश्रम
यशस्वीतेसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना शहराध्यक्ष दीपक सोनवणे, तालुकाध्यक्ष तुषार वाढे, तालुका सचिव विलास कोळी, तालुका उपाध्यक्ष दशरथ सपकाळे, जिल्हा उपाध्यक्ष मनविसे प्रतीक भंगाळे, शहराध्यक्ष मनवीसे, वैभव सुरवाडे, प्रणय भागवत व कार्यकर्ते उपस्थित होते.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !