भुसावळातील के.नारखेडे विद्यालयात शिक्षक पालक सहविचार सभा उत्साहात
Teacher-Parent Consultation Meeting Held with Great Enthusiasm at K. Narkhede School in Bhusawal भुसावळ (17 मार्च 2026) : शहरतील के.नारखेडे विद्यालयात नववीतून दहावीत जाणार्या विद्यार्थ्यांची पालकांची सहविचार सभा के.नारखेडे विद्यालयात शनिवार, 14 मार्च 2026 रोजी सकाळी आठ वाजता झाली. मुख्याध्यापिका अॅड.संगीता अडकमोल यांनी प्रास्ताविक केले.
अभ्यासासाठी विद्यार्थ्याला जागृत करणे, शाळेतील ग्रंथालयाचा वापर विद्यार्थ्याने स्वतःच्या प्रगतीसाठी करावा कारण की शाळेचा केंद्रबिंदू हा विद्यार्थी असतो. मुलांचा अभ्यास हा शाळा व कुटुंब या दोघांचीही जबाबदारी असते आणि यासाठी मुलांना शाळेत रोज पाठवणे हे महत्त्वाचे असल्याचे शिक्षक एस.एम.चिपळूणकर म्हणाले.

शिस्त हा प्रत्येक शाळेचा आत्मा आहे व त्यासाठी पालकांचे सहकार्य अपेक्षित आहे. विद्यार्थ्याला औपचारिक व अनौपचारिक शिक्षण हे दोघेही मिळावे त्यासाठी पालकांनी सहकार्य करावे, असे विज्ञान शिक्षक बी.बी.जोगी म्हणाले.
संगणक विभाग शिक्षिका सोनाली फेगडे यांनी संगणकाचे महत्व व रोबोटिक्स कार्यशाळे ची आवश्यकता विद्यार्थी व पालकांसमोर व्यक्त केली. संस्थाध्यक्ष डॉ.मकरंद नारखेडे यांचे मार्गदर्शन लाभले.
सूत्रसंचालन एस.डी.वास्कर तर आभार शाळेतील पर्यवेक्षक एस.पी.पाठक यांनी मानले. कार्यक्रमासाठी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका संगीता अडकमोल, पर्यवेक्षक एस.पी.पाठक, वरिष्ठ शिक्षक बी.बी.जोगी, संगणक विभाग प्रमुख बी.ए.पाटील, पालक-शिक्षक संघाचे उपाध्यक्ष भागवत पाटील यांची उपस्थिती लाभली.