भुसावळातील कोटेचा महाविद्यालयाचे प्रा.विनोद भालेराव यांना पीएच.डी.पदवी प्रदान

ग्रामीण कथांवरील संशोधनाबद्दल गौरव


भुसावळ (17 मार्च 2026) : कडगाव येथील रहिवासी आणि संशोधक तथा भुसावळातील प.क.कोटेचा महाविद्यालयाचे सहाय्यक प्रा.विनोद सुभाष भालेराव यांना कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातर्फे नुकतीच पीएच.डी. पदवी बहाल करण्यात आली. विनोद भालेराव यांनी 1990 नंतरच्या ग्रामीण कथांमधील बदलत्या जीवन जाणीवांचा अभ्यास (सदानंद देशमुख, अशोक कोळी, आसाराम लोंमटे यांच्या कथांच्या अनुषंगाने) या विषयावर आपला शोधप्रबंध सादर केला होता. या संशोधनाद्वारे त्यांनी 90 च्या दशकानंतर ग्रामीण जीवनातील बदलत्या नातेसंबंधांचे स्वरूप, मूल्यांचे होत असलेले अध:पतन, बदललेली जातीय समीकरणे आणि शेतीविषयक नव्या धोरणांचा जनजीवनावर झालेला परिणाम यावर सखोल प्रकाश टाकला आहे.

यांची होती उपस्थिती
हे संशोधन कार्य प्रा. डॉ. अक्षय घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण झाले. या प्रवासात त्यांना डॉ.वासुदेव वले, प्रसिद्ध साहित्यिक डॉ. सदानंद देशमुख, डॉ.अशोक कोळी आणि डॉ.आसाराम लोंमटे यांचेही अमूल्य मार्गदर्शन लाभले. विद्यापीठात झालेल्या अंतिम मौखिक परीक्षेसाठी अध्यक्ष म्हणून डॉ.आशुतोष पाटील (क.ब.चौ.उ.म.वि. जळगाव) तर बहिस्थ परीक्षक म्हणून डॉ. नामदेव गपाटे (बनारस हिंदू विश्वविद्यालय, वाराणसी) उपस्थित होते.


यशाबद्दल अभिनंदन
डॉ. विनोद भालेराव सध्या भुसावळ येथील श्रीमती प. क. कोटेचा महिला महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या या यशाबद्दल संस्थाध्यक्षक दीपेश कोटेचा, प्रभारी प्राचार्य डॉ. जीवन धांडे, आय.क्यू.ए.सी. समन्वयक डॉ.जे.व्ही.धनवीज यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !