भुसावळ शहरात 20 रोजी रक्तदान शिबिर


Blood Donation Camp in Bhusawal City on the 20th भुसावळ (18 मार्च 2026) : आखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरूपीठ, श्री क्षेत्र त्रंबकेश्वर जि नाशिक, श्री स्वामी समर्थ सेवा अध्यात्मिक विकास व बालसंस्कार केंद्र दिंडोरी प्रणीत श्री स्वामी समर्थ केंद्र भुसावळ आणि डॉ.उलहास पाटील वैद्यकिय महाविद्यालय व रूग्णालय रक्तपेढी जळगाव यांच्या सयुक्त विद्यमाने भुसावळ शहरात शुक्रवार, 20 रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

सेवेकर्‍यांना सहभागाचे आवाहन
श्री स्वामी समर्थ यांच्या प्रकट दिनानिमीत्त नंदनवन कॉलनीतील खाचणे हॉल भुसावळ येथे सकाळी 9 ते 5 यावेळेत हे शिबिर श्री स्वामी समर्थ केंद्र भुसावळ तर्फे आयोजित करण्यात आले आहे .शिबिरात डॉ.उलहास पाटील वैद्यकिय महाविद्यालय व रूग्णालय रक्तपेढी जळगावचे तज्ञ सहकार्य करणार असून जास्तीत जास्त सेवेकरींनी सहभाग नोंदवावा असे आवाहन केंद्रामार्फत करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी सुरेश न्हावकर 9423950924 आणि लक्ष्मण पाटील 9326150006 यांचेशी संपर्क साधावा.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !