धुळे जिल्हा परिषदेच्या तत्कालीन अधीक्षकांना लाच प्रकरणात तीन वर्ष शिक्षा


The then superintendent of Dhule Zilla Parishad was sentenced to three years in a bribery case धुळे (18 मार्च 2026) : धुळे जिल्हा परिषदेचे तत्कालीन अधीक्षक पंकज विक्रम पाटील यांना दहा हजारांच्या लाच प्रकरणात अटक करण्यात आल्यानंतर त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. धुळे जिल्हा व सत्र न्यायालयात या खटल्याचे कामकाज चालल्यानंतर पाटील यांच्यावरील आरोप सिद्ध झाल्याने त्यांना तीन वर्ष शिक्षा व दहारांचा दंड सुनावण्यात आला आहे.

असे आहे प्रकरण
तक्रारदाराने शिंदखेडा तालुक्यातील विरदेल अंगणवाडीचे काम वेळेत पूर्ण न केल्याने त्यांना शिंदखेडा उपविभागाच्या उपअभियंत्यांनी नोटीस बजावली होती. त्यावेळी पंकज पाटील यांच्याकडे प्रभारी अधीक्षकपदाचा कार्यभार असल्याने त्यांनी प्रकरण मिटवण्यासाठी दहा हजार मागितल्याने त्यांच्याविरोधात एसीबीकडे तक्रार दिल्यानंतर 16 सप्टेंबर रोजी 2016 त्यांना धुळे एसीबीने अटक केली होती. तत्कालीन निरीक्षक पवन देसले यांनी गुन्ह्याचा तपास करीत दोषारोपपत्र दाखल केले होते.



तीन वर्ष शिक्षा व दंड
या खटल्याचे कामकाज धुळे सत्र न्यायालयात चालल्यानंतर आरोपी पंकज पाटील विरोधात दोष सिद्ध झाल्याने त्यास तीन वर्ष शिक्षा दहा हजार रुपये दंड सुनावण्यात आला. दंड न भरल्यास तीन महिने साध्या कारवासाची शिक्षा सुनावण्यात आली. धुळे उपअधीक्षक सचिन साळुंखे, पैरवी अंमलदार प्रवीण पाटील, सागर शिर्के यांनी कामकाज पाहिले. सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी अभियोक्ता देवेंद्र तंवर व सरकारी अभियंता अजय सानप यांनी काम पाहिले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !