चाळीसगावच्या शेतकर्‍याचे बँक खाते हॅक करीत साडेपाच लाखांचा गंडा


Chalisgaon Farmer Swindled Out of ₹5.5 Lakhs After Bank Account Is Hacked जळगाव (18 मार्च 2026) : चाळीसगाव तालुक्यातील एका शेतकर्‍याचे बँक खाते हॅक करीत सायबर भामट्याने पाच लाख 49 हजार 401 रुपयांची ऑनलाईन लूट केली. याबाबत मंगळवार, 17 मार्च रोजी दुपारी पाच वाजता सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

काय आहे प्रकरण ?
चाळीसगाव तालुक्यातील पाटणा येथील रहिवासी महेश ईश्वर जामदार 31) यांचे सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या स्टेशन रोड शाखेत बचत खाते आहे. 21 फेब्रुवारी ते 27 2026 या कालावधीत अज्ञात सायबर चोरट्याने जामदार यांचा मोबाईल क्रमांक (जो बँक खात्याशी लिंक होता) तो हॅक केला.



या हॅकिंगद्वारे चोरट्याने जामदार यांच्या बँक खात्याचा ताबा मिळवला आणि वेळोवेळी विविध बँक खात्यांमध्ये पैसे ट्रान्सफर केले. काही दिवसांतच जामदार यांच्या खात्यातून ळज्ञि लाख 49 हजार 401 रुपये लंपास करण्यात आले. आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात येताच जामदार यांनी सायबर पोलिसांकडे धाव घेतली. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास निरीक्षक सतीश गोराडे करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !