सामाजिक बांधिलकी : भुसावळातील प्रतिष्ठा महिला मंडळातर्फे जलपात्रांचे वाटप

उपक्रमाचे पाचवे वर्ष : उन्हाळ्यात घराबाहेर पक्ष्यासाठी दाणा-पाण्याची व्यवस्था करण्याचे आवाहन


Social Commitment: Distribution of Water Vessels by the Pratishtha Mahila Mandal in Bhusawal भुसावळ (22 मार्च 2026) : मार्च महिन्यात उन्हाचा प्रचंड वाढलेला पारा व पुढील दोन महिन्यानंतर दुपारी वाढत जाणारा उन्हाचा कडाका पाहता अशा वातावरणात पक्ष्यांना पाणी तसेच खाद्य वेळेवर मिळत नसल्याने अनेकदा हे पक्षी तडफडून प्राण सोडतात तसेच त्यांचे निष्प्राण देह झाडाखाली पडलेले दिसून येतात व हे मन सुन्न करणारे चित्र बदलण्यासाठी सामाजिक उपक्रमात अग्रेसर असलेल्या भुसावळातील प्रतिष्ठा महिला मंडळाने भूतदया जोपासत गेल्या पाच वर्षांपासून जलपात्र वाटपाचा उपक्रम हाती घेतला आहे. शुक्रवार, 20 रोजी जागतिक चिमणी दिनाचे औचित्य साधून शहरवासीयांना जलपात्राचे मोफत वाटप करण्यात आले.

उपक्रमाचे पाचवे वर्ष
पक्ष्यांची किलबिल लहानांपासून थोरांना सर्वांनाच आवडते मात्र उन्हाळ्यात हेच पक्षी रखरखत्या उन्हात जेव्हा दाण्या-पाण्यावाचून गतप्राण होतात तेव्हा मनाला प्रचंड वेदना होतात व हेच चित्र बदलण्यासाठी भुसावळातील प्रतिष्ठा महिला मंडळाने पुढाकार घेत भूतदया जोपासत गेल्या पाच वर्षांपासून जलपात्र वाटपाचा उपक्रम हाती घेतला आहे. शहरातील अहिल्या देवी कन्या विद्यालयाजवळ मंडळाच्या अध्यक्षा रजनी संजय सावकारे यांच्या अध्यक्षतेखाली जलपात्र वाटपाचा उपक्रम राबवण्यात आला.


यांची होती उपस्थिती
या छोटेखानी कार्यक्रमास अनिता आंबेकर, नगरसेविका सोनल महाजन, वैशाली सैतवाल, वैशाली भगत, राजश्री बादशाह, वर्षा लोखंडे, जयश्री चौधरी यांच्यासह महिला मंडळाच्या सर्व सदस्या उपस्थित होत्या.

प्रत्येकाने जोपासावी भूतदया : रजनी सावकारे
उन्हाळ्यात पक्ष्यांचे दाणा-पाण्याअभावी हाल होवू नये यासाठी जागृत नागरिक म्हणून प्रत्येकाने भूतदया जोपासावी. आपापल्या घराबाहेर किमान उन्हाळ्याच्या दिवसात जलपात्राच्या माध्यमातून पक्ष्यासाठी दाणा-पाण्याची व्यवस्था करावी, असे प्रतिष्ठा मंडळाच्या अध्यक्षा रजनी सावकारे म्हणाल्या.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !