भुसावळात विरोधकांचे गलिच्छ राजकारण : दुटप्पी भूमिकेमुळे शहर विकासाला बाधा ! गायत्री भंगाळे यांचा आरोप
Opposition’s Sordid Politics in Bhusawal: City Development Hampered by Double Standards! — Gayatri Bhangale Alleges भुसावळ (22 मार्च 2026) : भुसावळ पालिकेतील राजकीय आखाडा दिवसागणिक तापत असतानाच आता दुसर्यांदा तहकूब होवून 23 मार्च रोजी होणारी सभा पुन्हा तहकूब करण्यात आली आहे. ही सभा नेमकी कधी होणार? याबाबत अस्पष्टता आहे त्यामुळे भुसावळचे राजकारण रंजक वळणावर आल्याचे स्पष्ट चित्र आहे. त्यातच भुसावळच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा गायत्री भंगाळे यांनी पत्र प्रसिद्धीला दिले असून त्यात विरोधकांनी गलिच्छ राजकारण चालवल्याचा व दुटप्पी भूमिका घेतल्याचा दावा केला आहे.
विरोधकांची दुटप्पी भूमिका
गायत्री भंगाळे यांनी माध्यमांना दिलेल्या पत्रानुसार, भुसावळ पालिकेतील विरोधकांनी गलिच्छ राजकारण सुरू केले आहे. प्रत्येक कामात अडचण निर्माण करणे, अधिकार्यांना सुट्टीवर पाठवणे, कर्मचार्यांवर दबाव आणणे, भुसावळ शहराच्या विकासासाठी सर्वसाधारण सभेत घेतलेल्या विविध विषयांवर सभेत गोंधळ घालणे तसेच प्रत्येक सभेला जिल्हाधिकारी यांच्याकडे दर्शविला विरोध आणि भुसावळ न.पा. यांच्याकडे प्रत्येक सभेतील प्रत्येक विषयाला घेतलेला लेखी आक्षेप तर दुसरीकडे पत्रकार परिषदा घेवून दुटप्पी भूमिका मांडल्यामुळे संभ्रम निर्माण होत आहे. भुसावळ शहरातील जनतेला अशा दोगल्यापणाच्या राजकारणापासून सावध राहण्याची गरज आहे.

सभा घेतली की विरोध व नाही घेतली की रोष !
सर्वसाधारण सभा घेतली की सर्व विषयांना विरोध केला जातो शिवाय लेखी तक्रार जिल्हाधिकार्यांकडे दाखल केली जाते की, ही सभा बेकायदेशीर आहे तर दुसरीकडे सभा घेतकी नाही रोष व्यक्त केला जातो. सभा घेतली तर विरोध आणि नाही घेतली की आक्षेप अशीा दुटप्पी भूमिका भाजपचे नगरसेवक घेत आहेत.
सर्वच सभांना भाजपा नगरसेवकांचा विरोध
पलिकेच्या पहिल्या सभेत 250 विषय घेण्यात आले पण त्यापैकी 140 विषयांना विरोध करण्यात आला तोही जिल्हाधिकार्याकडे तसेच लेखी तक्रारच्या माध्यमातून तसेच नगरपरिषदेच्या माध्यमातून मुख्याधिकारी यांना लेखी आक्षेप देण्यात आली की, हे विषय ना मंजूर करण्यात यावे तसेच दुसरी सभा 341 विषयांवर चर्चा करण्यासाठी घेण्यात आली परंतु भुसावळ शहराच्या विकासाबाबत घेतल्या गेलेल्या विषयांवर चर्चा न करता तेथे गोंधळ घालण्यात आला परंतु जिल्हाधिकार्यांकडे 333 विषयावर हरकत घेण्यात आली. मग एकही विषय न मंजूर होण्यासाठी विरोध करणे आणि दुसरीकडे दुटप्पी भूमिका घेणे.
तर पालिकेत सभा कशी होणार ?
दुसरीकडे सभा तहकूब झाल्यास 308 कलम खाली जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करणे की, सभा तहकूब करत आहेत. अशा प्रकारच्या दोगल्या भूमिका भुसावळ शहरातील भाजपाचे नगरसेवक घेत असून जर विरोधक सभेत घेतले गेलेल्या सर्व विषयांवर आक्षेप नोंदवित असतील आणि जिल्हाधिकार्याकडे आक्षेप घेत असतील तर सभा कशी होणार ? भुसावळ शहरातील विकासासाठी ज्या सभा घेतल्या जात आहेत आणि त्याच्यावर अनेक विषय घेतले जात आहे या सर्व विषयांना भाजपाच्या नगरसेवकांच्या माध्यमातून विरोध केला जात आहे म्हणून वारंवार गोंधळ घालून या सभा भाजपाच्या नगरसेवक विरोध करून सभा तहकूब करीत आहेत. भुसावळकरांना सत्य परिस्थिती अवगत व्हावी या उद्देशाने माध्यमांना पत्र दिले असल्याचे भंगाळे यांनी पत्रात नमूद केले आहे.
