भडगावात एमडी ड्रगचा साठा जप्त : दाम्पत्याला अटक


MD Drug Stock Seized in Bhadgaon : Couple Arrested भडगाव (23 मार्च 2026) : पोलिसांनी मोठी कारवाई ‘एमडी’ (मेफेड्रोन) या घातक अमली पदार्थाचा साठा जप्त करीत दाम्पत्याला अटक केल्याने संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. याबाबत भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गोपनीय माहितीवरून कारवाई
पारोळा शहराकडून भडगावकडे एका खाजगी कारमधून अमली पदार्थांची मोठी खेप येणार असल्याची गोपनिय माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर भडगाव पोलिसांनी जुन्या पारोळा रस्त्यावरील पाण्याच्या टाकीजवळ रविवार, 22 मार्च रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास कडेकोट नाकाबंदी करून सापळा रचला. यावेळी संशयास्पद वाटणारी फोर्ड फिस्टा कार क्रमांक (एम.एच.01 बी.बी.2216) अडवून तिची सखोल झडती घेण्यात आली.


घातक ‘एमडी’ साठा जप्त
तपासणीदरम्यान कारमध्ये अत्यंत चलाखीने लपवून ठेवलेल्या मेफेड्रोन (एम.डी.) या अंमली पदार्थाच्या 14.350 ग्रॅम वजनाचे सुमारे 10 पुड्या (किंमत 40 हजार) जप्त करण्यात आल्या. पोलिसांनी हा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत पोलिसांनी अमली पदार्थांसह तस्करीसाठी वापरलेली कारही जप्त केली आहे. जप्त करण्यात आलेल्या पदार्थाची तांत्रिक खातरजमा करण्यासाठी जळगाव येथील फॉरेन्सिक तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले.. या प्रकरणामागे अंमली पदार्थ तस्करीचे एखादे मोठे आंतरजिल्हा रॅकेट कार्यरत असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

या प्रकरणी पोलिसांनी योगेश हरी चौधरी (35) व त्याची पत्नी (दोघेही रा. पारोळा, ह.मु. भडगाव) जागीच ताब्यात घेतले आहे. दोघांवर एनडीपीएस कायद्यांर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक महेश शर्मा करीत आहे.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !