वढोदा गावाजवळ अपघातात खिरोद्यातील तरुण ठार

यावल पोलिसात अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल


यावल (24 मार्च 2026) : यावल तालुक्यातील वढोदा गावाजवळ अंकलेश्वर-बर्‍हाणपूर राज्य मार्गावर स्मशानभूमीच्या समोर अज्ञात वाहनाच्या धडकेत 19 वर्षीय तरुण हा गंभीर जखमी झाला. या तरुणावर नाशिक शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते व उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी यावल पोलीस ठाणे अज्ञात वाहनचालकाविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला.

काय आहे प्रकरण ?
वढोदा, ता.यावल या गावातून अंकलेश्वर-बर्‍हाणपूर राज्यमार्ग मार्गस्थ होतो. या राज्य मार्गावर चोपड्याच्या दिशेने स्मशानभूमी आहे. या स्मशानभूमीच्या समोरून मोटरसायकल (क्रमांक एम. एच.19 ई.बी. 2989) द्वारे कुशल सुरेश इंगळे (19, रा.खिरोदा, ता.रावेर) हा तरुण जात असताना अज्ञात वाहनाने धडक दिली आणि यामध्ये तो गंभीर जखमी झाला.


अपघातानंतर जखमी अवस्थेत या तरुणाला प्रारंभी यावल ग्रामीण रुग्णालय व नंतर नाशिक शहरातील एका खाजगी रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केले. तेथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात वैभव सुरेश इंगळे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात वाहन चालकाविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास यावल निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सुनील पाटील करीत आहे.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !