मंत्र्यांना धक्काबुक्की करणार्या पोलिसांमागे अदृश्य शक्ती ! : खासदार सुप्रीया सुळे यांचा दावा
मुंबई (24 मार्च 2026) : राज्यात सत्तेत धाकटा भाऊ म्हणणार्या ापक्षातील मंत्र्यांनाच धक्काबुक्की होत असेल तर राज्याचे राजकारण कुठल्या दिशेने सुरू आहे? याचा विचार करण्याची गरज आहे शिवाय मंत्री शंभुराज देसाई यांना झालेल्या धक्काबुक्की प्रकरणाचा आणि पोलिसांचा काहीही संबंध नाही. पोलिसांच्या मागे जी अदृश्य शक्ती होती त्यांची ही ताकद आहे. त्या शक्तीने पोलिसांना हे करायला लावले, पोलिस स्वत:हून असे काही करणार नाही, असा मला विश्वास असल्याचे शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.
सातार्यातील घटनेचा जाहीर निषेध
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, सातार्यात जी घटना झाली त्याचा मी जाहीर निषेध करते. मला धक्का बसला हा यशवंतराव चव्हाण यांचा महाराष्ट्र आहे. चव्हाणांनी मंगल कलश आणला तो काय हा दिवस पाहण्यासाठी का? असा सवाल सुप्रिया सुळेंनी केला आहे. माझा विश्वासच बसू शकत नाही की कॅबिनेट मंत्र्यांना मतदान करण्यासाठी धक्काबुक्की होऊ शकते.

संविधानानेच देश चालणार
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, शंभूराज देसाई यांच्या हाताला दुखापत झाली आहे. मी काल मकरंद आबा यांना फोन करत हे काय सुरू आहे, कसे सहन करायचे असे म्हटले आहे. काल विधीमंडळाच्या पायर्यावर अजित पवार गटातील मकरंद आबा आणि शिवसेनेचे सर्व आमदार उभे होते. ते सर्व लढायचा प्रयत्न करत होते. हे सर्व दुर्दैवी आणि सशक्त लोकशाहीसाठी दुर्दैवी आहे. या विरोधात लढाई झालीच पाहिजे. हा देश कुणाच्या मर्जीने चालणार नाही. केवळ डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानानेच देश चालणार.
मग मार का खाता?
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, मकरंद पाटील, शंभुराज देसाई यांना धक्काबुक्की झाली असेल त्यांना न्याय मिळत नसेल तर ही निवडणूक रद्द झाली पाहिजे. या प्रकरणी चौकशी झाली पाहिजे. सरकारमध्ये तुम्ही आहात तेच सरकार तुम्हाला धक्काबुक्की करत आहे, पांडुरंगा हे काय दिवस बघावे लागत आहेत. ते ही मित्र पक्षाच्या नेत्यांना. तुम्ही सत्तेत एकत्र आहात आणि धाकटा भाऊ म्हणणार्याला धक्काबुक्की होत असेल तर राज्याचे राजकारण कुठल्या दिशेने सुरू आहे. तुम्ही शिवराय, शाहु-फुले-आंबेडकर यांचे नाव घेत राजकारण करता मग मार का खाता? असा सवाल सुळेंनी केला आहे.




