तंत्रविद्येसाठी अनामिका कापल्याचा अंधारेंचा आरोप : रुपाली चाकणकरांनी व्हिडिओ शेअर करीत दुखापतीचे कारणच सांगितले


Andhare Alleges Fingers Were Severed for Occult Practices: Rupali Chakankar Shares Video, Revealing the Actual Cause of the Injury मुंबई (24 मार्च 2026) : भोंदू अशोक खरातच्या नादाला लागून तंत्रमंत्र विद्येसाठी चाकणकरांनी आपली अनामिका कापल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केल्यानंतर राज्यात खळबळ उडाली आहे. या आरोपाचे खंडण चाकणकरांनी करीत या संदर्भात धायरीच्या गणेश मंडळाचा व्हिडिओ शेअर केला आहे. गाडीतील खाली उतरताना दरवाजात अनामिका अडकल्याने दुखापत झाल्याचे यात कार्यकर्ते सांगताना दिसतात.

चाकणकरांनी फेटाळले आरोप
भोंदू अशोक खरात व त्यांच्याशी संबंधित असलेल्या पुढार्‍यांमुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. भोंदू खरात सध्या तुरुंगात आहे. या प्रकरणी रुपाली चाकणकर यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यातच सुषमा अंधारे यांनी त्यांच्यावर तंत्रमंत्र विद्येचा आरोप केल्यामुळे एकच खळबळ उडाली. या पार्श्वभूमीवर रुपाली चाकणकर यांनी आज एका पोस्टद्वारे सुषमा अंधारे यांचे आरोप जोरकसपणे फेटाळून लावण्याचा प्रयत्न केला आहे. आपल्या पोस्टमध्ये त्यांनी धायरीतील एका गणेश मंडळाच्या अध्यक्षाचा व्हिडिओ पोस्ट केला आहे.


मंडळाचे अध्यक्ष म्हणाले हा तर ‘ध चा म’ करण्याचा प्रकार
व्हिडिओनुसार मंडळाचे अध्यक्ष सांगत आहे की, रुपाली चाकणकर दरवर्षी आमच्या गणेश मंडळाच्या आरतीला येतात. गतवर्षीही त्या आरतीला आल्या होत्या. त्यावेळी गाडीतून उतरताना त्यांचे बोट दरवाज्यात अडकल्याने गंभीर दुखापत झाली होती. त्यानंतरही त्यांनी टिश्यू पेपरने जखम कोरडी करून त्यांनी गणपत्ती बाप्पांची आरती पूर्ण केली. हा संपूर्ण प्रकार आमच्या गणेश मंडळाच्या सीसीटीव्हीमध्येही दिसून येईल. चाकणकर यांच्यावर होणारे आरोप वैयक्तिक स्वरुपाचे असून फोटोविषयी ‘ध’ चा ‘मा’ करण्यात आला आहे.

चाकणकरांचा सुषमा अंधारेंवर हल्ला
रुपाली चाकणकर यांनी या प्रकरणी सुषमा अंधारेंवर त्यांचे नाव न घेता जोरकसपणे टीका केली आहे. गेली 20-22 वर्ष सामाजिक, राजकीय क्षेत्रात काम करताना, जसजसा प्रगतीचा आलेख वाढत गेला तसतशी चिखलफेक करणारी विकृती वाढत गेली. प्रत्येक वेळी संयमाने शांतपणाने टिका सहन केली. वैयक्तिक टिका करणे हे माझ्या रक्ताताच नाही पण आता सगळ्या मर्यादा ओलांडून माझ्यासह कुटुंबाला जो त्रास दिला जातोय ते भयावह आहे.

ज्यांनी हा आयुष्याचा प्रवास जवळून पाहिला, ते सर्व संपर्क करून आम्ही सोबत आहोत हे आवर्जून सांगतात. त्या सर्वांचे आभार. खरात प्रकरणात मी पहिल्या दिवशीच भूमिका स्पष्ट केली आहे. तपास निष्पक्षपणे व्हावा यासाठी आयोगाच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला व त्यानंतरही माझ्यावर केलेल्या आरोपांचे पुराव्यासह स्पष्टीकरण दिले आहे. सत्य समोर येईलच. धायरीकर तुमचे मनापासून धन्यवाद, असे त्यांनी म्हटले आहे.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !