भोंदूबाबाकडून व्हायरल व्हिडिओनंतर प्रकरण दडपण्याचा प्रयत्न : मुख्यमंत्र्यांकडे तक्रार जाताच पडले उघडे पितळ


Attempt to Cover Up the Scandal Involving a Charlatan Godman Following a Viral Video: The Deception Was Exposed the Moment a Complaint Reached the Chief Minister मुंबई (24 मार्च 2026) : नाशिकमधील विकृत भोंदूबाबा अशोक खरातचे प्रकरण राज्यात सर्वत्र चर्चेत आले आहे. अध्यात्माच्या नावाखाली अनेक महिलांचे लैंगिक शोषण करणार्‍या भोंदू विरोधात आतापर्यंत सहा गुन्हे दाखल करण्यात आले असून कोट्यवधींची माया भोंदूने जमवल्याचे उघड आहे. विशेष म्हणजे आरोपीला व्हायरल व्हिडिओची माहिती मिळाल्यानंतर त्याने लोकप्रतिनिधीचे मदत घेत प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला तसेच पीडितेच्या पतीवरच गुन्हा दाखल करून त्यांना कायदेशीर कचाट्यात अडकवण्याचा प्रयत्नकेला मात्र मुख्यमंत्र्यांपर्यंत प्रकरणाची तक्रार गेल्यानंतर भोंदूचा पर्दाफाश झाला.

भोंदूकडून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न
भोंदू अशोक खरातला आपल्या कृत्यांचा व्हिडीओ व्हायरल झाल्याची कुणकूण लागताच त्याने हे प्रकरण दडपण्याचे प्रयत्न सुरू केले होते. पीडित महिलांनी न्यायासाठी सुरुवातीला एका आमदाराची भेट घेऊन त्यांना सर्व आपबिती सांगितली होती मात्र तिथे त्यांच्या पदरी निराशाच पडली. संबंधित आमदाराने पीडितांना मदत करण्याऐवजी उलट खरातलाच या तक्रारीची पूर्वसूचना दिली. ज्याचा फायदा घेत खरातने हे प्रकरण दाबण्यासाठी उलट पीडितेच्या पतीवरच गुन्हा दाखल करून त्यांना कायदेशीर कचाट्यात अडकवण्याचा प्रयत्न केला. याबाबतचे वृत्त ‘दिव्य मराठी’ने ऑनलाईन दिले आहे.


मुख्यमंत्र्यांकडून अत्याचाराची दखल
मात्र, या अन्यायापुढे हार न मानता पीडितांनी दुसर्‍या एका आमदाराची भेट घेतली, ज्यांनी या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दाद मागितली. मुख्यमंत्र्यांच्या कानावर हा प्रकार जाताच प्रशासकीय यंत्रणा वेगाने हलली आणि या संपूर्ण अत्याचारकांडाला वाचा फुटली. लोकप्रतिनिधींची खंबीर साथ आणि मुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपामुळेच या भोंदूबाबाचे काळे कारनामे चव्हाट्यावर आले असून पीडितांना न्याय मिळण्याची आशा निर्माण झाली.

आतापर्यंत सहा गुन्हे दाखल : पीडीतांना तक्रारीचे आवाहन
नाशिकमधील स्वयंघोषित भोंदू बाबा अशोककुमार एकनाथ खरात उर्फ ‘कॅप्टन खरात’ याच्या काळ्या कारनाम्यांविरुद्ध नाशिक पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. अशोक खरातवर आतापर्यंत सहा फौजदारी गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी विशेष तपास पथक नियुक्त करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर, एसआयटीने आता पीडितांसह जनतेला समोर येण्याचे आणि तक्रार नोंदवण्याचे आवाहन केले आहे. तसेच माहिती देणार्‍यांची ओळख गोपनीय ठेवली जाईल, असे आश्वासनही पोलिसांकडून देण्यात आले आहे.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !