भुसावळात समावेशित शिक्षण प्रशिक्षण वर्ग उत्साहात


भुसावळ (24 मार्च 2026) : समावेशित शिक्षणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पालक, मुख्याध्यापक, वर्गशिक्षक, केंद्रप्रमुख, अंगणवाडी सेविका, व पर्यवेक्षक यांच्यासाठी आयोजित दोन दिवसीय प्रशिक्षण वर्ग उत्साहात पार पडला.

यांची होती उपस्थिती
23 व 24 मार्च रोजी आयोजित या प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन गटशिक्षणाधिकारी किशोर वायकोळे, शिक्षण विस्तार अधिकारी तुषार प्रधान तसेच केंद्रप्रमुख सुनील मोरे, राजेश पाटील, उषा देसले ,पल्लवी अंभोरे, प्रशांत चौधरी यांच्याहस्ते करण्यात आले. प्रशिक्षण पुंडलिक गणपत बर्‍हाटे विद्यालय, भुसावळ येथे आयोजित करण्यात आले होते.


या प्रशिक्षण वर्गात समावेशित शिक्षणाची संकल्पना, त्याचे महत्त्व व अंमलबजावणी याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. प्रत्येक विद्यार्थ्याला-तो कोणत्याही जातीचा, धर्माचा, लिंगाचा किंवा शारीरिक-मानसिक स्थितीचा असो-समान शिक्षणाची संधी मिळणे आवश्यक असून, समावेशित शिक्षणामुळे सर्व विद्यार्थी एकत्र शिकत सहकार्य, समजूतदारपणा व समानतेच्या मूल्यांची जपणूक करतात, असे प्रतिपादन मार्गदर्शकांनी केले. तसेच सर्वांसाठी शिक्षण हीच समाज प्रगतीची खरी दिशा असल्याचेही अधोरेखित करण्यात आले.

या प्रशिक्षणासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून स्पीच थेरपिस्ट ज्योती चांदेकर यांच्यासह सुरेखा पांडव, संदीप बोरसे, विलास सूर्यवंशी, विलास सरदार, पेमेंदसिंग राजपूत, दीपक पाटील, तुकाराम पाटील व सदानंद तायडे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.

सूत्रसंचालन समाधान जाधवतर आभार केंद्रप्रमुख सुनील मोरे यांनी मानले. प्रशिक्षण यशस्वी होण्यासाठी अशोक तायडे यांनी विशेष परिश्रम घेतले. प्रसंगी महेंद्र पाटील, गोकुळ राजपूत, माधुरी पाटील व चेतना गवळी यांनी आपले मनोगत व्यक्त करत प्रशिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. प्रशिक्षण वर्गास पालक, मुख्याध्यापक, वर्गशिक्षक, केंद्रप्रमुख, अंगणवाडी सेविका, व पर्यवेक्षक यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !