भालोद महाविद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
Honoring of Meritorious Students at Bhalod College भालोद, ता.यावल (24 मार्च 2026) : विद्यार्थ्यानी जिद्द चिकाटी आणि प्रामाणिकपणा अंगी बाळगला तर तो शैक्षणिक क्षेत्रात नक्कीच यशस्वी होतो किंबहुना यश त्याचा पाठलाग करते त्यामुळे विद्यार्थ्यांनी परीक्षेला सामोरे जाताना मी अभ्यास केला आहे मी परीक्षेत चांगल्या गुणांनी पास होणार आहे हा मंत्र बोलावा कॉपी मुक्त परीक्षा तुमच्या सारख्या अभ्यासू विद्यार्थ्यांमुळेच यशस्वी होते, असे प्रतिपादन भालोद महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.किशोर कोल्हे यांनी केले.
यांची होती उपस्थिती
सेकंडरी एज्युकेशन सोसायटी संचलित कला व विज्ञान महाविद्यालय, भालोद येथे राज्यशास्त्र विभागाच्या वतीने स्टुडंट अचिव्हमेंट सेरेमनी- अॅकॅडमिक एक्सलन्स इन पॉलिटिकल सायन्स गुणवंत विद्यार्थी सत्कार हा कार्यक्रम सोमवार, 23 मार्च रोजी उत्साहात पार पडला. यावेळी ते बोलत होते.

प्रसंगी व्यासपीठावर उपप्राचार्य प्रा.मुकेश चौधरी, प्रा.डॉ.जतीनकुमार मेढे, प्रा.डॉ.अजय कोल्हे, प्रा.डॉ.राकेश चौधरी, प्रा.डॉ.दिनेश पाटील, प्रा.डॉ.आशुतोष वर्डिकर, प्रा.मोहिनी तायडे, प्रा.डॉ.वसंतराव पवार, प्रा.काशिनाथ पाटील, प्रा.गीतांजली चौधरी, राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा.डॉ.सुनील नेवे हे उपस्थित होते.
राज्यशास्त्र विभागप्रमुख प्रा.डॉ.सुनील नेवे यांनी कार्यक्रमाचे उद्दिष्ट स्पष्ट करत विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक केले. राज्यशास्त्र विषयातील यशस्वी विद्यार्थ्याना आगामी विद्यापीठ परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या तसेच ज्या विद्यार्थ्याना आज यश मिळवता आले नाही त्यांनी या नंतर च्या काळात अधिक मेहनत घ्यावी खूप चिंतन मनन करावे असे आवाहन केले त्यानंतर व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांचे विद्यार्थ्यांकडून स्वागत करण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार होय. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.किशोर कोल्हे यांच्या आणि व्यासपीठावरील मान्यवरांच्या शुभहस्ते प्रथम वर्ष, द्वितीय वर्ष, तृतीय वर्ष कला या वर्गातील राज्यशास्त्र विषयात उल्लेखनीय यश संपादन करणार्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक तसेच इतर गुणवंत विद्यार्थ्यांना शैक्षणिक भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.
या मध्ये प्रथम वर्ष कला या वर्गातील वाढे प्रमोद तायडे, पायल तायडे, सोनाली जाधव, वैशाली तायडे, राजेश्वरी प्रजापती, भूमिका बाविस्कर, नरेंद्र मोरे, नयना पांचाळ, लक्ष्मण बोरनारे, आशिष सपकाळे, विठ्ठल सोनवणे, वैष्णवी चव्हाण, दर्शन सपकाळे, हर्षदा सपकाळे, कुलदीप मानेकर, मयूरी सपकाळे, दीपाली पाटील, राजश्री कोळी, वैशाली पाटील तसेच द्वितीय वर्ष कला या वर्गातील अक्षय पाटील, पूजा मोरे,
करण झाल्टे, महेंद्र सपकाळे, अश्विन इंगळे, साहील तडवी, मयूर सपकाळे, तृतीय वर्ष कला वर्गातील जागृती सपकाळे, हर्षा शंकोपाळ, मानसी सोनवणे, तृप्ती जावरे, रोशन सोनवणे, कविता माचवे, हर्षाली माचवे, करण जावरे, जयश्री बादशाह, प्रीती सपकाळे, तेजल झाल्टे, अजय चौधरी, चेतन कचरे या विद्यार्थ्यांचा समावेश होता.
विद्यार्थी मनोगत सत्रात तेजल झाल्टे व पूजा मोरे यांनी आपले अनुभव मांडत यशामागील परिश्रम अधोरेखित केले. त्यानंतर प्राचार्य डॉ.किशोर कोल्हे यांनी मार्गदर्शन करत विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक युगात सातत्य, शिस्त आणि अभ्यासाची सवय यांचे महत्त्व पटवून दिले.
कार्यक्रमात आगामी विद्यापीठ परीक्षांबाबत मार्गदर्शन तसेच अंतर्गत गुणांच्या वितरणाबाबत माहिती देण्यात आली. शेवटी प्रा.मोहिनी तायडे यांनी आभार प्रदर्शन केले. सूत्रसंचालन विद्यार्थी आशिष बोरनारे याने केले. विद्यार्थी अतुल सोनवणे, भूषण अडकमोल, वैभव सोनवणे, धनराज कोळी, हर्षल कोळी, आरिश पिंजारी, शेख समीर, शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.




