के.एन.सी.टी.आय.एम.टी.एस परीक्षेतर्फे गुणवंतांचा गौरव सोहळा उत्साहात
भुसावळ (25 मार्च 2026) : शहरातील के.नारखेडे कॉम्प्युटर टेक्नालाजी संस्थेतर्फे के.एन.सी.टी.आय.एम.टी.एस परीक्षा 2026 मधील चौथी व सातवीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरण सोहळा मंगळवार, 24 मार्च रोजी सकाळी 10 वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत के.नारखेडे विद्यालयात झाला.
यांची होती उपस्थिती
श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे सेक्रेटरी व केएनसीटीआय संस्थेचे अध्यक्ष पी.व्ही पाटील अध्यक्षस्थानी होते. प्रमुख अतिथी म्हणून सेंट अलॉयसीस हायस्कूलच्या मुख्याध्यापिका व सिस्टर शीला सायमन (सेक्रेटरी- सोसायटी ऑफ अवर, लेडी ऑफ फातिमा भुसावळ) उपस्थित होत्या. संगीत शिक्षक डी.एम.हेलोडे, एम.व्ही.कुलकर्णी यांनी करून वातावरण निर्मिती केली. प्रास्ताविक परीक्षा समिती प्रमुख व के.नारखेडे कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी या संस्थेचे संगणक विभाग प्रमुख बी.ए.पाटील यांनी केले.

यांचा झाला सन्मान
प्रसंगी शाळेतील उपशिक्षक एस.एम.चिपळूणकर, एम.व्ही.कुलकर्णी यांनी मान्यवरांचा परिचय दिला. केंद्र स्तरावरील इयत्ता चौथी व सातवीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला. इयत्ता चौथीत जिल्ह्यातून प्रथम तनुश्री राजेंद्र काळे (खाजगी प्राथमिक शाळा शिरसोली), द्वितीय- ओजस्वी मनोज पाटील (खाजगी प्राथमिक विद्यामंदिर, पिंपळगाव हरेश्वर) तसेच इयत्ता सातवीत जिल्ह्यातून प्रथम- हर्षित रवी रत्नानी (सेंट अलॉयसीस हायस्कूल, भुसावळ), द्वितीय- मेहेक रवी कुकरेजा (सेंट अलायसीस हायस्कूल, भुसावळ) या सर्व बक्षीस पात्र विद्यार्थ्यांना बक्षीसे देवून गौरवण्यात आले.
यश मिळवण्यासाठी प्रयत्नशील रहा
मिळालेल्या यशावर न थांबता यश कसे टिकवून ठेवता येईल यासाठी सतत प्रयत्नशील असावे तसेच स्वतःवर, स्वतःच्या प्रयत्नांवर स्वतःच्या स्वप्नांवर विश्वास ठेवा, असा मोलाचा संदेश सिस्टर शीला सायमन यांनी दिला. पी.व्ही.पाटील यांनी परीक्षेचा स्तर उंचावत ठेवण्याची आयोजकांकडून अपेक्षा व्यक्त केली. उपस्थित पालकांमधून प्रमोद पालवे तसेच याशिका गुळवे (उल्हास पाटील इंग्लिश मिडियम स्कूल सावदा) या विद्यार्थिनीने आपले मनोगत व्यक्त केले.
यांची होती उपस्थिती
एमटीएस परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व बक्षीसपात्र विद्यार्थ्यांचे श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ.मकरंद नारखेडे, उपाध्यक्ष किशोर नारखेडे, खजिनदार श्रीनिवास नारखेडे, कार्यकारीणी सभासद डॉ.संजीव नारखेडे आदींनी भरभरून कौतुकाचा वर्षाव केला. सूत्रसंचलन तु.स.झोपे शाळेचे उपशिक्षक राहुल भारंबे यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सेक्रेटरी पी.व्ही.पाटील होते. सहसेक्रेटरी विकास पाचपांडे, संस्थेचे ऑनररी जॉईंट सेक्रेटरी प्रमोद नेमाडे, एमटीएस परीक्षा समिती प्रमुख बी.ए.पाटील, के.नारखेडे विदयालयाच्या मुख्याध्यापिका अॅड.संगीता अडकमोल, कायदेतज्ञ पुरुषोत्तम नेमाडे, पर्यवेक्षक एस.पी. पाठक, तु.स.झोपे विद्यामंदिर शाळेचे मुख्याध्यापक सुनील वानखेडे, एन.के.नारखेडे इंग्लिश मिडीयम स्कुलच्या मुख्याध्यापिका अर्चना कोल्हे उपस्थित होत्या. यशस्वीतेसाठी के.नारखेडे विद्यालयाचे पर्यवेक्षक एस.एल.राणे, एस.पी.पाठकर, एस.एम.चिपळोणकर, मनोज कुलकर्णी, सी.बी.जोगी, राहुल भारंबे, एम.ए.तडवी, एस.पी.झांबरे, चेतन ठोंबरे, गणेश जगताप, सारिका भारंबे, प्रमोद तळेले, सुनील भोळे, दिनेश गायकवाड, शुभम ढाके, रवींद्र बादशाह तसेच संगणक विभागातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचार्यांनी परिश्रम घेतले.




