तायक्वांडो स्पर्धेत जैन स्पोर्ट्सची पूर्वा चौधरीला कांस्यपदक


जळगाव, दि. 25 (प्रतिनिधी) : ओडिशा येथे नुकताच झालेल्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ तायक्वांडो स्पर्धेत पूर्वा चौधऱी हिने महिलांच्या 53 किलोच्या वजन गटात कांस्यपदक पटकावले. ती जळगाव जिल्हा तायक्वांडो असोसिएशन तथा जैन स्पोर्टस् अकॅडमीची खेळाडू आहे.

तिला प्रशिक्षक जयेश बाविस्कर तसेच मुख्य प्रशिक्षक अजित घारगे यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभले आहे. तिच्या या यशाबद्दल जळगाव जिल्हा तायक्वांडो असोसिएशनचे अध्यक्ष अतुल जैन, उपाध्यक्ष ललीत पाटील, सहसचिव रवींद्र धर्माधिकारी, कोषाध्यक्ष सुरेश खैरनार, सदस्य कृष्णकुमार तायडे, महेश घारगे, नरेंद्र महाजन, सौरभ चौबे तसेच जैन स्पोर्टस् अकॅडमीचे अरविंद देशपांडे यांनी कौतूक केले आहे.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !