अमळनेरात क्रेनच्या धडकेने वयोवृद्धाचा मृत्यू
Elderly Man Dies After Being Struck by Crane in Amalner अमळनेर (25 मार्च 2026) : भरधाव क्रेनने दिलेल्या धडकेत अमळनेरातील वयोवृद्धाचा मृत्यू झाला. हा अपघात अमळनेर ते चोपडा रोडवरील गजानन महाराज मंदिराजवळ घडला. याप्रकरणी अमळनेर पोलिसात क्रेन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
असा घडला अपघात
जयरामदास दर्यानोबल धर्मांनी (72, रा. सिंधी कॉलनी, अमळनेर) हे बुधवार, 24 मार्च रोजी सकाळी 11 च्या सुमारास आपल्या सायकलने चोपडा रोडवरून जात होते. ते गजानन महाराज मंदिराजवळून सिंधी कॉलनीकडे येत असताना अमळनेरकडून चोपडाकडे जात असलेले क्रेन (एम.एच.19 सी.व्ही.1677) ने त्यांना जोराची धडक दिल्याने जयरामदास धर्मांनी यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. या क्रेनवरील चालकाने वाहन भरधाव वेगात आणि निष्काळजीपणे चालवून रस्त्यावरील परिस्थितीकडे दुर्लक्ष केल्याने हा अपघात घडल्याचे फिर्यादीत नमूद आहे. तपास गणेश पाटील करीत आहेत.





