चोरीच्या संशयावरून 19 वर्षीय तरुणाला लाकडी दांडक्याने मारहाण


19-Year-Old Youth Beaten with a Wooden Stick on Suspicion of Theft जळगाव (25 मार्च 2026) : जळगाव शहरातील पिंप्राळा हुडको परिसरात चोरीच्या संशयावरून एका 19 वर्षीय तरुणाला लाकडी दांडक्याने आणि लोखंडी सळईने बेदम मारहाण करण्यात आली. या प्रकरणी रामानंदनगर पोलिसात तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

काय घडले जळगावात?
जळगाव शहरातील उस्मानिया पार्क परिसरात राहणारे हम्मीद अब्बास खाटीक (49) यांचा मुलगा अबरार उर्फ चिरक्या (19) याने चोरी केली असल्याचा संशयावरून मंगळवार, 24 मार्च रोजी पहाटे तीन वाजेच्या सुमारास पिंप्राळा हुडको भागात संशयित आरोपी पंकज, सुपड्या (पुर्ण नाव माहित नाही), किरण अशोक सपकाळे (तिघे रा. पिंप्राळा हुडको, जळगाव) यांनी अबरारला गाठले. त्यानंतर त्याला शिवीगाळ करत दमदाटी केली आणि हातातील लाकडी दांडका आणि लोखंडी आसारीने अबरारवर हल्ला केला. या हल्ल्यात अबरार हा गंभीर जखमी झाला.


याप्रकरणी अबरारचे वडील हम्मीद खाटीक यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सुपड्या, पंकज आणि किरण अशोक सपकाळे (सर्व रा.पिंप्राळा हुडको, जळगाव) यांच्या विरोधात रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार भिका खाटीक करीत आहे.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !