चाळीसगावात अल्पवयीन मुलीचा विनयभंग : एकाविरोधात गुन्हा
Molestation of a Minor Girl in Chalisgaon : Case Registered Against One Person चाळीसगाव (25 मार्च 2026) : शहरातील वर्दळीच्या नेताजी चौकात 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग करण्यात आला. याप्रकरणी मंगळवारी रात्री 11 वाजता चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात एकाविरोधात विनयभंग आणि पोक्सो अंतर्गत कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
काय घडले शहरात ?
चाळीसगाव तालुक्यातील एका गावातील 15 वर्षीय पीडीता शहरात शिक्षण घेते. मंगळवार, 24 मार्च दुपारी 12.30 वाजेच्या सुमारास शाळा सुटल्यानंतर ती आपल्या गावाकडे निघाल्यानंतर नेताजी चौकातील महादेव मंदिराजवळ दबा धरून बसलेला संशयीत राजेंद्र महेंद्र पाटील (25, चाळीसगाव तालुका) याने लज्जास्पद वर्तन केले.

या अनपेक्षित प्रकारामुळे मुलगी घाबरली मात्र तिने धीर न सोडता आरडाओरड करण्यास सुरुवात केली. तिने आरोपीला थांब, मी घरी फोन लावून तुझे नाव सांगते असे ठणकावून सांगितले. मुलीचा आक्रमक पवित्रा पाहून आरोपी राजेंद्र पाटील याने तिथून पळ काढला.
याप्रकरणी पिडीत मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी राजेंद्र महेंद्र पाटील विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस उपनिरीक्षक अरुण बाविस्कर करीत आहे.




