जळगाव जिल्हापेठ पोलिसांची मोठी कामगिरी : खुनातील संशयीताकडून दोन गावठी कट्टा व आठ तलवारी जप्त


Major Achievement by Jalgaon Districtpeth Police :  Two Country-made Pistols and Eight Swords Seized from Murder Suspect जळगाव (25 मार्च 2026) : खुनाच्या गुन्ह्यातील पसार आरोपी साथीदारासह जिल्हापेठ पोलिसांना गवसला असून त्याच्याकडून दोन गावठी बनावटीचे पिस्टल व आठ तलवारी जप्त करण्यात आल्या आहेत.

गोपनीय माहितीवरून कारवाई
जिल्हापेठचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल वाघ यांना रामानंदनगर पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या खुनाच्या गुन्ह्यातील संशयीत धीरज कोळी हा जळगावात आल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी कारवाईचे निर्देश दिले. आर.आर. शाळेच्या बाजूच्या गल्लीत मोटारसायकल (एम.एच.19 ए.झेड.2412) वर दोन संशयीत आल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आले असता चौकशीत त्यांची नावे धनंजय उर्फ धीरज दत्तू कोळी (20, रा.पाळधी, ता.धरणगाव) व अजय मारुती डोळे (23, रा.नेरीदिगर, ता.जामनेर) निष्पन झाली.


झडतीत तलवार शस्त्र जप्त
पोलिसांनी संशयितांची झडती घेतली असता मोटारसायकलला बांधलेल्या पोतडीत एक तलवार मिळून आली. अधिक तपासणी केली असता, पेट्रोल टाकीच्या खाली इंजिनजवळ लपवलेला एक गावठी कट्टा हस्तगत करण्यात आला. पुढील तपासात व तीन दिवसांच्या पोलीस कोठडी दरम्यान आरोपींकडून एकूण 2 गावठी पिस्टल आणि 8 तलवारी जप्त करण्यात आल्या.. अटक करण्यात आलेल्या आरोपींवर यापूर्वीही गंभीर गुन्हे दाखल आहेत.

आरोपीविरोधात गंभीर गुन्हे
आरोपी धीरज कोळी याच्यावर धरणगाव आणि रामानंदनगर पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे आणि मारामारीचे गुन्हे दाखल आहेत. तो रामानंदनगर येथील खुनाच्या गुन्ह्यात पसार असून आरोपी अजय डोळे याच्यावर नाशिक येथील अंबड पोलीस स्टेशनमध्ये आर्म अ‍ॅक्ट आणि इतर कलमान्वये गुन्हा दाखल आहे.

यांनी आवळल्या आरोपींच्या मुसक्या
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय अनिल वाघ, पोलीस उपनिरीक्षक गोपाळ देशमुख, जिल्हापेठ पोलीस स्टेशनचे मिलिंद सोनवणे, महेश महाजन, तुषार पाटील, गोविंद साबळे, विशाल साळुंखे, समाधान पाटील, राहुल पाटील, नरेंद्र दिवेकर, ईश्वर खवडे, जयेश मोरे, साहेबराव खैरनार आदींनी केली.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !