भुसावळात उसनवारीच्या पैशातून कुटूंबावर प्राणघातक हल्ला : तरुण जखमी
Deadly Attack on Family Over Borrowed Money in Bhusawal : Youth Injured भुसावळ (25 मार्च 2026) : उधारीवर दिलेले चार हजार रुपये परत मागण्याच्या वादातून दोघांनी कुटूंबावर प्राणघातक हल्ला करीत तरुणाच्या डोक्यात लोखंडी धारदार वस्तू मारून दुखापत केली. तुंबळ हाणामारीची ही घटना शहरातील आगाखान वाड्यात 24 मार्च रोजी सायंकाळी सहा वाजता घडली. या प्रकरणी दोघांविरोधात बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला
काय आहे प्रकरण
शाहरुख शेख हसीद उर्फ मुन्ना (28, आगाखान वाडा, भुसावळ) यांच्या तक्रारीुनसार, त्यांनी आरोपींकडून चार हजार रुपये उसने घेतले होते व ते परत करूनही संशयीत त्यांच्याकडे पुन्हा पैसे परत मागत असल्याने मंगळवारी सायंकाळी वाद उफाळला.

संशयीतांनी हातावर तोंडावर मारहाण करीत शिविगाळ केली तसेच डोक्यात काहीतरी लोखंडी वस्तू मारल्याने दुखापत होवून मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाला तसेच फिर्यादीची पत्नी फरहिन, आई सुरय्याबी, वडील हसीद उर्फ मुन्ना हे भांडण सोडवण्यासाठी गेल्यानंतर संशयीत जमीला यांनी लोखंडी पाईप उचलून फरहीन यांना मारहाण केली तसेच फिर्यादीच्या वडीलांनाही रहिम याने मारहाण करीत जीवे ठार मारण्याची धमकी दिली.
या प्रकरणी संशयीत रहिम रऊफ कुरेशी व जमीला रऊफ कुरेशी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार तेजस पारीस्कर करीत आहेत.




