पाच हजारांची लाच भोवली : जळगाव तालुक्यातील तलाठी एसीबीच्या जाळ्यात
असे आहे लाच प्रकरण
तक्रारदार हे जळगाव तालुक्यातील रहिवासी आहेत. त्यांनी त्यांच्या पत्नीच्या नावाने संबंधित तलाठ्याच्या कार्यक्षेत्रात शेती खरेदी केली असून या खरेदी केलेल्या क्षेत्राची अधिकृत नोंद सरकारी दप्तरी लावण्यासाठी सजा करंजचे तलाठी अजय बिडवे यांनी पाच हजारांची लाच मागितली. तक्रारदाराला लाच द्यायची नसल्याने त्यांनी जळगाव एसीबीकडे तक्रार केल्यानंतर पडताळणी करण्यात आली व 27 फेब्रुवारी रोजी सापळा रचण्यात आला व मात्र तक्रारदाराच्या हालचालीवरून तलाठ्याला संशय आल्याने त्यांनी त्यावेळी लाच स्वीकारली नाही मात्र पडताळणीत लाच मागणी सिद्ध झाल्याने व त्याचा वरिष्ठांचा अहवाल आल्यानंतर गुरुवार, 26 रोजी तलाठ्याविरोधात जळगाव तालुका पोलिसात गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली.

यांनी केली कारवाई
ही कारवाई नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी आणि सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव ‘एसीबी’चे पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर, पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे, पोलीस निरीक्षक हेमंत नगरे, श्रेणी उपनिरीक्षक दिेनेशसिंग पाटील, हवालदार संगीता पवार, बाळू मराठे, अमोल सूर्यवंशी, प्रणेश ठाकूर आदींच्या पथकाने केली.




