सोयगावच्या शेतकर्‍याचे 50 हजार लांबवले : जळगावातील हद्दपार आरोपीला पाचोरा पोलिसांच्या बेड्या


Soygaon Farmer Swindled Out of ₹50,000 : Pachora Police Arrest Accused Person Externed from Jalgaon पाचोरा (26 मार्च 2026) : बाजरी विक्रीची रोकड घेवून घराकडे निघालेल्या सोयगाव तालुक्यातील शेतकर्‍याकडील 50 हजारांची रोकड बसमध्ये चढताना चोरट्यांनी लांबवली होती. ही घटना पाचोरा बसस्थानकात 24 मार्च रोजी घडल्यानंतर पाचोरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पाचोरा पोलिसांना काही संशयीत बसस्थानकावर चोरीच्या उद्देशाने आल्याची माहिती मिळाल्यानंतर अंकुश मधुकर सुरवाडे (19, गेंदालाल मिल, जळगाव) यास ताब्यात घेण्यात आल्याने त्याने अल्पवयीन साथीदारासोबत चोरीची कबुली दिली. विशेष महणजे आरोपी सुरवाडे हा कुख्यात असून त्याला दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले आहे तर अल्पवयीन साथीदाराविरोधातही गुन्हे दाखल असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, उपअधीक्षक बी.जी.रोहम, पाचोरा पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कॉन्स्टेबल योगेश पाटील, संदीप राजपूत, हरीश परदेशी, गणेश कुंवर, पंकज सोनवणे, अमोल गायकवाड आदींच्या पथकाने केली. तपास हवालदार राहुल शिंपी करीत आहेत.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !