दंगा पेटवणारी टोळी नंदुरबार जिल्ह्यातून हद्दपार : जिल्हा पोलिस अधीक्षकांचे आदेश
Gang Inciting Riots Externed from Nandurbar District: Orders by District Superintendent of Police नंदुरबार (26 मार्च 2026) : दंगा पेटवण्यासह सामाजिक शांततेला अडसर ठरू पाहणार्या नऊ जणांच्या टोळीला नंदुरबार जिल्हा पोलिस अधीक्षकांनी कलम 55 अन्वये जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार केल्याने गुन्हेगारी वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
हे सदस्य दोन वर्षांसाठी हद्दपार
बिरसा फायटर्सचा अध्यक्ष तथा टोळीप्रमुख सुशीलकुमार जहांगीर पावरा (40, रा.होळ उंटावद, शहादा, जि.नंदुरबार), रोहिदास गेमजी वळवी (60, रा.लोय पिंपळोद, ता.नंदुरबार), वकिल राहुल श्रीराम कुवर, (39, रा.तिसी, ता.नंदुरबार), रवींद्र रंजित वळवी (52, रा. दुधाळे शिवार, ता.नंदुरबार), पंकज राजेंद्र वळवी (31, रा.जुना बैल बाजार, ता.नंदुरबार), गोपाल रमेश भंडारी (34, रा.शहाणा, ता.शहादा, जि.नंदुरबार), अजय मधू वळवी (33, रा.टोकरतलाव, ता.जि.नंदुरबार), दिलीप नभू मुसळदे (32, रा.टूकी, ता.शहादा), सतीश पांडु ठाकरे (40, रा.फत्तेपूर, ता.शहादा) या नऊ सदस्यांना नंदुरबार जिल्हा हद्दीतून हद्दपार करण्यात आले आहे.

गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल
संबंधित इसमांविरुध्द शहादा पोलीस ठाणे तसेच इतर ठिकाणी टोळी जमवून मारामारी करणे, धमकी देणे, शासकीय कामात अडथळा निर्माण करणे तसेच सार्वजनिक शांततेस बाधा आणणे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे, जिल्हाधिकारी यांच्या मनाई आदेशाचे पालन न करणे अशा प्रकारचे गंभीर गुन्हे नोंद आहेत. हे सर्व इसम संघटीत टोळीच्या स्वरुपात कार्यरत राहून स्थानिक नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण करीत होते शिवाय नंदुरबार शहर पोलीस ठाणे गु.र.नं. – 583/2025 या गुन्हयात जो मोठा दंगा झाला त्यात अतिशय गंभीर परिस्थिती उद्भवली होती. तसेच या टोळी प्रमुख व काही सदस्यांनी पसरविलेल्या खोटया अफवांमुळे व चिथावणीमुळे अनेक आदिवासी तरुणांवर गुन्हे दाखल होवून त्यांना अटक देखील झाली होती. त्याचप्रमाणे नंदुरबार जिल्ह्यात आदिवासी विरुध्द बिगर आदिवासी असा प्रचंड तणाव निर्माण झाला होता व त्यामुळे सामाजिक एकतेला गंभीर धोका निर्माण झाला होता. तसेच सदर टोळीप्रमुख सुशीलकुमार पावराविरुध्द दोन शाळकरी मुलींचा विनयभंग केल्याचा अतिशय गंभीर गुन्हा (पोस्को) देखील रत्नागिरी येथे दाखल होता.
या पार्श्वभूमीवर, संबंधित इसमांच्या वर्तवणुकीमुळे सार्वजनिक सुव्यवस्था वारंवार धोक्यात येत असल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांना त्यापासून परावृत्त करण्यासाठी त्यांच्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून हद्यपार कारवाई करणे आवश्यक असल्याने संबंधितांना हद्दपार करण्यात आल्याचे आदेशात नमूद आहे. संबंधितानीं आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितांविरुध्द कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येणार आहे.




