वीज बिल वसुली करताना खंडाळेत महिला कर्मचार्‍याला शिविगाळ : एकाविरोधात गुन्हा


Female Employee Abused While Collecting Electricity Bills in Khandale : Case Registered Against One Person भुसावळ (26 मार्च 2026) : मार्च एण्ड जवळ आल्याने वीज वितरण कंपनीच्या महिला कर्मचारी ज्योती शिंपी या खंडाळे गावात वसुलीसाठी गेल्यानंतर त्यांना एकाने अश्लील शिविगाळ करीत त्यांच्या शासकीय कामात अडथळा आणला. ही घटना बुधवार, 25 रोजी घडली. याप्रकरणी खंडाळे गावातील काशीनाथ बाबुसेठ विरोधात भुसावळ तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

संशयीताविरोधात गुन्हा दाखल
वीज कंपनीच्या शिंदी कार्यालयातील वरिष्ठ तंत्रज्ञ ज्योती संजय शिंपी (46) यांनी मंगळवार, 24 रोजी खंडाळे गावात जावून थकबाकीदारांना वीज बिल भरण्याचे आवाहन केले व ज्यांनी वीज बिल भरले नाही त्यांचा वीजपुरवठा कट करण्यात येईल, असेदेखील सूचवले व त्यानंतर बुधवार, 25 रोजी त्या पुन्हा खंडाळे गावात 12.30 वाजता थकबाकीदारांचा वीजपुरवठा कट करण्यासाठी गेल्यानंतर काशीनाथ बाबू सेठ यांना बिल भरण्यासंदर्भात सूचवल्यानंतर ते अंगावर धावून आले व अश्लील शिविगाळ करू लागले व यापूर्वी देखील त्यांनी असाच प्रकार केल्याचे तक्रारीत नमूद आहे. शिंपी यांच्या तक्रारीवरून संशयीत काशीनाथ बाबू सेठ विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास कॉन्स्टेबल सुधीर विसपुते व तडवी करत आहे. यावेळी भुसावळ ग्रामीण उपविभागाचे अभियंता महाजन साहेब, शिंदी शाखेचे अभियंता आखरे व सर्व सहकारी कर्मचारी व संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.


 







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !