यावलला पत्नीस घेण्यात आलेल्या जावयास जबर मारहाण


Son-in-law severely beaten in Yawal while picking up his wife यावल (26 मार्च 2026) : यावल शहरातील महाराणा प्रताप नगरात कब्रस्तान समोरील कुटुंबाकडे 22 वर्षीय तरुण त्याच्या पत्नीस घेण्याकरीता आला होता. तेथे त्यांच्यात वाद झाल्याने तरुणास शिवीगाळ करून मारहाण करण्यात आली. सासर्‍याने लोखंडी पत्राने मारून त्याला जबर दुखापत केली. या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय घडले शहरात ?
यावल चोपडा रस्त्यावर महाराणा प्रताप नगर आहे. या महाराणा प्रताप नगरा जवळ कब्रस्तान आहे. या कब्रस्तान समोर अशोक बाबुराव सकट हे राहतात. त्यांच्याकडे त्यांचे जावई शंकर कांतीलाल हातागळे (22, रा.शेंदुर्णी, फुकटपुरा, ता.जामनेर) हा त्याची पत्नी रोशनीला घेण्यासाठी आला असता तेथे त्यांचात वाद झाला आणि या वादातून शंकर हातागळे या 22 वर्षीय जावयाला सासरे अशोक बाबुराव सकट, शालक आकाश अशोक सकट, तरुणाची पत्नी रोशनी शंकर हातागळे व सासू छायाबाई अशोक सकट या चौघांनी शिवीगाळ करून मारहाण केली.


सासर्‍याने लोखंडी पत्राने जावयाच्या तोंडावर, डाव्या बाजूला, दोन्ही हातावर व कानाजवळ मारून जबर दुखापत केली. तयाप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात शंकर हातागळे यांच्या फिर्यादीवरून चार जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक वसीम तडवी करीत आहे.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !