डॉक्टरांचे घर फोडले ; 73 हजारांचा ऐवज चोरीला


Doctor’s House Burglarized; Valuables Worth ₹73,000 Stolen जळगाव (26 मार्च 2026) :  नशिराबाद परिसरातील के.जी.एन. कॉलनी परिसरात असलेल्या एका बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी सुमारे 73 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल लंपास केला. याप्रकरणी बुधवार, 25 मार्च रोजी दुपारी एक वाजता नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बंद घर चोरट्यांना पर्वणी
साकीब मलिक सादीक मलिक (26, रा. जळगाव) हे व्यवसायाने डॉक्टर असून त्यांचे घर 18 मार्च ते दि. 23 मार्च दरम्यान बंद होते. अज्ञात चोरट्यांनी याचा फायदा घेत घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला.


घरातील कपाटातील आणि इतर मौल्यवान वस्तूंसह स्टडी टेबल व इतर साहित्याची उचकापाचक करून चोरट्यांनी सुमारे 73 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. डॉ.मलिक हे घरी परतल्यानंतर त्यांना घराचे कुलूप तुटलेले दिसले आणि घरात चोरी झाल्याचे लक्षात आले. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस उपनिरीक्षक विजय कोळी करत आहेत.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !