रेल्वेतील फुकट्या प्रवाशांना चाप : विशेष मोहिमेत तीन लाखांचा दंड वसुल


भुसावळ (27 मार्च 2026) : रेल्वेतील वाढत्या गर्दीचा फायदा घेत फुकट्या प्रवाशांकडून रेल्वेचे जनरल तसेच स्लीपर डब्यातील घुसखोरी होत असल्याने रेल्वे प्रशासनाने 25 रोजी विशेष मोहिम राबवत भुसावळ विभागात फोर्ट्रेस तिकीट तपासणी मोहीम राबवली. विभागातील एकूण आठ प्रमुख स्थानकांवर 55 तिकीट तपासणी कर्मचारी व 9 रेल्वे सुरक्षा बल कर्मचारी सहभागी झाले. या मोहिमेद्वारे एकूण 491 प्रकरणांमधून दोन लाख 82 हजार 770 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

याशिवाय, रेल्वे कायद्याच्या कलम 145 अंतर्गत एकूण 03 प्रकरणे नोंदविण्यात आली असून त्यातून दोन हजार शंभर रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.


तसेच स्थानक परिसरात अनधिकृतरीत्या व्यवसाय करणार्‍या 05 विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्यावर नियमानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

नियमानुसार प्रवास करण्याचे आवाहन
रेल्वे प्रवाशांनी योग्य आणि वैध तिकीट खरेदी करून जबाबदारीने व सन्मानाने प्रवास करावा जेणेकरून गैरसोय आणि दंड टाळता येईल, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !