जळगावात चक्रवर्ती सम्राट अशोक राजा जयंतीनिमित्त कार्यक्रम


जळगाव (27 मार्च 2026) : महान बौद्ध शासक प्रियदर्शी चक्रवर्ती सम्राट अशोक राजा यांच्या 2330 व्या जयंतीनिमित्ताने सम्राट अशोक ध्यान साधना केंद्र, जिजाऊ नगरात जयंती साजरी करण्यात आली. प्रास्ताविक भीम कन्या ग्रुपच्या अध्यक्ष माधुरी साळुंखे यांनी केले. चक्रवती सम्राट अशोक राजांच्या कार्याचा गुणगौरव तसेच बौद्ध शासनामधील त्यांच्या जीवनातील अत्यंत महत्त्वाची भूमिका याबद्दल सुमन पांगरकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

सम्राट अशोकांनी केलेले लोक कल्याण कार्य जसे मनुष्यांसाठी व प्राण्यांसाठी रुग्णालय बांधणे, उद्योगधंदे व व्यापारासाठी प्रोत्साहन देणे यात्रेकरूंसाठी आरामदायी व्यवस्था करणे तसेच सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे बौद्ध धम्माचा प्रचार प्रसार केला तसेच 84 हजार स्तूप निर्माण केले आदी कार्यावर उजाळा देण्यात आला. भारती म्हस्के, दीपाली अनिल सपकाळे, मीना पगारे, उषा सपकाळे, शीतल अहिरे यांनी मनोगत व्यक्त केले. सुरेखा भालेराव यांनी आभार मानले.


यांची होती उपस्थिती
कार्यक्रमास रत्ना मनोरे, संगीता सोनवणे, ज्योती साळुंखे, पुष्पा कदम, संगीता सपकाळे, सुरेखा भालेराव, शीतल अहिरे, माधुरी साळुंखे, उषा सपकाळे, मीना पगारे, भारती म्हस्के, दीपाली सपकाळे, सुमन पांगरकर आदीी महिला उपस्थित होत्या.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !