आमदार अमोल जावळे यांच्या पुढाकारातून धरणे होणार गाळमुक्त ; शेतकर्यांना गाळ नेण्याचे आवाहन
बैठकीत रावेर मतदारसंघातील मध्यम व लघू प्रकल्प, पाझर तलाव, सिमेंट नाला बंधारे तसेच उथळ नाल्यांमधील साचलेल्या गाळाच्या उपशाच्या कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. जलस्त्रोतांमध्ये साचलेला गाळ शेतकर्यांनी स्वखर्चाने विनामूल्य आपल्या शेतात नेऊन शेतीसाठी वापरावा, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले.

तसेच जवळील जलस्त्रोतांमधून गाळ वाहून नेण्यासाठी इच्छुक शेतकर्यांनी उपविभागीय अधिकारी, फैजपूर तसेच संबंधित विभागाकडे मागणी अर्ज सादर करावेत. अर्ज प्राप्त होताच शेतकर्यांना तात्काळ परवानगी देण्यात येईल, अशी माहिती उपविभागीय अधिकार्यांनी दिली. या निर्णयामुळे शेतकर्यांमध्ये समाधान व आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
यावल तालुक्यासाठी शेतकर्यांनी नायब तहसीलदार अतुल गांगुर्डे (मो. 988129004) यांच्याशी, तर रावेर तालुक्यासाठी नायब तहसीलदार संजय तायडे (मो. 9823977593) यांच्याशी संपर्क साधावा, असेही सांगण्यात आले.
या बैठकीस उपविभागीय अधिकारी, तहसीलदार (यावल व रावेर), तालुका कृषी अधिकारी, गटविकास अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता (सावदा), मोर धरण उपविभाग हिंगोणा येथील उपअभियंता, जिल्हा परिषद सिंचन उपविभाग रावेरचे अधिकारी, वनविभागाचे आरएफओ तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.




