पाचोरासह जळगावातील दुचाकी चोरटा पोलिसांच्या जाळ्यात


Two-wheeler thief from Jalgaon, including Pachora, nabbed by police. जळगाव (27 मार्च 2026) : पाचोरा व जळगावातील दुचाकी चोरट्याला यंत्रणेने जळगाव बसस्थानकातून दुचाकी लांबवण्याच्या प्रयत्नात अटक केली. आकाश राजू खरे (रा.पिंप्राळा हुडको, जळगाव) व आकाश प्रकाश भील (रा.कासमपुरा, ता.पाचोरा) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

काय आहे प्रकरण ?
जळगावातील बसस्थानक परिसरातून एकाची दुचाकी चोरी झाल्याने जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. या गुन्ह्याचा तपास करत असताना जिल्हापेठ पोलीस स्टेशनच्या प्रभारी अधिकार्‍यांना गोपनीय बातमी मिळाली. त्याआधारे पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण करून संशयित आरोपींना निष्पन्न करीत त्यांना अटक केली व गुन्ह्यातील दुचाकी (एम.एच.19 डी.ए.5011) जप्त केली आहे.


यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी अनिल वाघ, शांताराम देशमुख, महेश महाजन, महेंद्र पाटील, मिलिंद सोनवणे, तुषार पाटील, विशाल साळुंखे, गोविंद साबळे आणि जयेश मोरे यांच्या पथकाने केली. तपास पोलीस अंमलदार महेंद्र पाटील करीत आहेत.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !