जामनेरात ट्रॅक्टरच्या धडकेनंतर दोन गटात तुंबळ हाणामारी


Massive Brawl Between Two Groups in Jamner Following Tractor Collision जामनेर (27 मार्च 2026) : ट्रॅक्टरने घराच्या भिंतीला धडक दिल्याच्या वादानंतर जामनेर शहरात दोन गटांत भीषण हाणामारी झाली. या घटनेत एका कुटुंबाला घरासमोर येऊन लाठ्या-काठ्या आणि लोखंडी रॉडने बेदम मारहाण करण्यात आली व राची तोडफोड आणि दगडफेक केल्याप्रकरणी गुरुवार, 26 मार्च रोजी रात्री 10 वाजता जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

असे आहे प्रकरण ?
जामनेरातील मदन नगरात आयशाबी शेख अनिस यांच्या घराच्या भिंतीला 24 मार्च रोजी संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास ट्रॅक्टरची धडक बसली व या कारणावरून संशयित आरोपी शहबाज खान युनूस खान याने आयशाबी व त्यांचे पती अनिस शेख बिस्मिल्ला खान यांना मारहाण करून शिवीगाळ केली. हा वाद तिथेच न थांबता पुन्हा रात्री 8 वाजता रात्री 8.15 च्या सुमारास अधिक विकोपाला गेला.


रात्रीच्या वेळी संशयित आरोपी युनूस खान हनिफ खान, शहबाज खान युनूस खान, आरबाज खान, आझर खान, आफसर खान आणि फैजान खान शब्बीर खान यांच्यासह इतर 5 ते 6 जणांच्या जमावाने हातात लाठ्या आणि लोखंडी रॉड घेऊन फिर्यादीच्या घरासमोर धिंगाणा घातला. महिलेच्या घरात अनधिकृतपणे प्रवेश करून अनिस शेख आणि त्यांच्या मुलाला मारहाण केली. इतकेच नव्हे तर घराच्या खिडक्यांच्या काचा फोडून आणि छताचे नुकसान करून परिसरात मोठी दहशत निर्माण केली.

या प्रकरणी आयशाबी शेख अनिस (50, रा.मदनी नगर, जामनेर) यांनी दिलेल्या तक्रारीवरून जामनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास बाळू भोई करीत आहे.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !