दोन लाखांची लाच घेताना प्रांताधिकारी एसीबीच्या जाळ्यात


Sub-Divisional Officer Caught in ACB Net While Accepting Bribe of Two Lakhs पुणे (27 मार्च 2026) : जुन्नर-आंबेगाव उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे यांना दोन लाखांची लाच स्वीकारताच एसीबीने अटक केल्याने महसूल वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. बिल्डिंग कंपलीशन सर्टिफिकेट देण्यासाठी शिंदेंनी लाच मागितल्यानंतर तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार दिली व लाच पडताळणी नंतर सापळा रचून शुक्रवारी शिंदेंना रंगेहाथ अटक करण्यात आली.

कार्यालय परिसरात कारवाई
सूत्रांच्या माहितीनुसार एसीबीने शिंदे यांच्या कार्यालय परिसरात सापळा रचला होता, ज्यात शिंदे अडकले. एसीबीची पुढील कारवाई सुरु असून त्यात अनेक धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान, थेट प्रांताधिकार्‍याला लाच घेताना रंगेहाथ बेड्या ठोकण्यात आल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. तब्बल दोन लाख रुपयांची लाच घेताना ही अटक करण्यात आली. ‘एबीपी माझा’ने या संदर्भात वृत्त दिले आहे.


 







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !