जळगावात उद्या ‘विशाल हिंदू मेळावा’
हिंदू समाजाच्या एकत्रीकरणाचा संकल्प
जळगाव (28 मार्च 2026) : जाती-जातीत विखुरलेल्या हिंदू समाजाला संघटीत करण्याच्या उद्देशाने जळगाव शहरात रविवार, 29 मार्च 2026 रोजी एका भव्य ‘विशाल हिंदू मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सकल हिंदू समाज, श्रद्धा कॉलनी परिसरातील विविध सोसायट्यांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
यांची असेल उपस्थिती
कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून मनोज सावंत (जळगाव जिल्हा सहप्रचार प्रमुख, रा. स्व. संघ आणि संचालक, गुरुकृपा क्लासेस) मार्गदर्शन करणार आहेत. तसेच ह.भ.प.विलासजी महाराज सायगावकर यांचे आशिर्वचन यावेळी लाभणार आहे. जितेंद्र लाठी हे अध्यक्षस्थानी असतील.

रामानंद नगर परिसरातील चर्च रोड श्री गणेश मंदिर परिसर, गजानन सोसायटी परिसर, पारिजात संकुल जवळ येथे हा मेळावा रविवार, दि. 29 मार्च 2026 रोजी सायंकाळी ठीक 5:30 वाजता सूरू होईल. ह.भ.प विलास सायगावकर हयांचे शिक्षण आळंदी देवाची येथे झाले आहे.




