भुसावळातील जवाहर डेअरीचे संस्थापक सुखदेव पाटील यांचे निधन : उद्या अंत्ययात्रा
भुसावळ (28 मार्च 2026) : शहरातील नामांकीत जवाहर डेअरीचे संस्थापक व हॉटेल जवाहर पॅलेसचे मालक सुखदेव भावसिंग पाटील (87) यांचे शनिवारी रात्री अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा रविवार, 29 रोजी सकाळी 10 वाजता त्यांचे निवासस्थान धनाई, मातृभूमी चौक, प्रोफेसर कॉलनी येथून निघेल. त्यांच्या पश्चात बंंधू, मुलगा, पुतण्या, जावई, सुना व नातवंडे असा परिवार आहे. ते नामदेवराव पाटील यांचे बंधू तर हेमंत पाटील यांचे वडील होत.





