यावल शहरात श्रीराम जन्मोत्सव निमित्ताने निघारी भव्य शोभायात्रा
रेणुका माता मंदिरात पूजा केल्यानंतर निघाली मिरवणूक
A grand procession was held in the city of Yawal on the occasion of the Shri Ram Janmotsav. यावल (29 मार्च 2026) : यावल शहरात मोठ्या उत्साहात गुरूवारी रात्री श्रीराम जन्मोत्सव निमित्ताने भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली होती. तत्पुर्वी आमदार अमोल जावळे यांच्या प्रमुख उपस्थितीत नगराध्यक्ष छायाताई पाटील व नगरसेवक अतुल पाटील यांच्या दाम्पत्याच्या हस्ते पूजा-आरती झाल्यानंतर शहरातील श्री रेणुका माता मंदिरापासून मिरवणुकीला सुरवात झाली. शहरात मिरवणुकीतील सजीव देखावे व वहनांनी नागरीकांचे लक्ष वेधले.
श्रीराम जन्मोत्सव उत्साहात
शहरात सालाबादा प्रमाणे यावर्षी देखील श्रीराम जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. शहरातील नगर परिषद कार्यालयाजवळील श्री रेणुका माता मंदिरात आमदार अमोल हरिभाऊ जावळे तसेच यावल नगरीच्या नगराध्यक्ष छायाताई अतुल पाटील व नगरसेवक अतुल पाटील यांच्या हस्ते पालखीची पूजा करण्यात आली व तेथुन भव्य अशी शोभायात्रा शहरातुन काढण्यात आली. वाजत, गाजत झांज पथकाच्या साह्याने भव्य मिरवणूक प्रमुख मार्गाने काढण्यात आली.

याप्रसंगी नगरसेवक सागर चौधरी, निलेश बारी, उमेश फेगडे, भाजपा गटनेता नंदा महाजन, आकाश चोपडे, गोलू माळी, भूषण फेगडे यांच्यासह सर्वपक्षीय कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. शहरातुन काढण्यात आलेल्या या मिरवणुकी सजीव देखावे यात प्रामुख्याने श्रीराम, हनुमान, सीता, लक्ष्मण, राक्षस आदींचे सजिव देखावे लक्षवेधी ठरले होते तसेच विविध वहनं यात सहभागी होते. शहरात पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे व पोलीस कर्मचार्यांनी प्रसंगी चोख बंदोबस्त ठेवला.




