खान्देशच्या प्रवाशांना मोठा दिलासा : भुसावळ-दादर विशेष गाडीला सहा महिन्यांची मुदतवाढ


Bhusawal-Dadar Special Train भुसावळ (29 मार्च 2026) : मध्य रेल्वेने प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी भुसावळ आणि दादर दरम्यान धावणार्‍या विशेष गाड्यांचा कालावधीमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. गाडी क्रमांक 09049 दादर -भुसावळ साप्ताहिक विशेष गाडीला 31 जुलै 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याने खान्देशातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

गाडी क्रमांक 09050 भुसावळ -दादर साप्ताहिक विशेष जी दिनांक 27 मार्च 2026 पर्यंत धावणार होती ती आता 31 जुलै 2026 पर्यंत धावणार आहे.


गाडी क्रमांक 09051 दादर-भुसावळ त्री साप्ताहिक विशेष गाडी 28 मार्च पर्यंत दर सोमवार, बुधवार आणि शनिवार रोजी चालवण्यात येणार होती ती आता 29 जुलै 2026 पर्यंत धावणार आहे. या गाडीच्या वेळ, मार्ग, संरचना आणि थांबे तेच राहणार असून रेल्वे प्रवाशांनी बदलाची नोंद घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !