जळगाव तालुक्यात वाळू वाहतुकीच्या डंपरने घेतला वयोवृद्धाचा बळी
Sand-Laden Dumper Claims Life of Elderly Man in Jalgaon Taluka जळगाव (28 मार्च 2026) : वाळू वाहतूक करणार्या डंपरने चिरडल्याने वयोवृद्धाचा मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना जळगाव तालुक्यातील धोबी वराड गावात शनिवार, 28 मार्च रोजी संध्याकाळी सात ते आठ वाजेच्या सुमारास घडली. बशीरशहा मगबुलशा फकीर (75, रा. धोबी वराड, ता.जळगाव) असे मयत वृद्धाचे नाव आहे.
काय घडले धोबी वराड गावात
बशी शहा हे गावात परिवारासह राहत होते. शनिवारी संध्याकाळी एका कामानिमित्त मराठी शाळेकडे गेल्यानंतर त्यांना डंपर (एम.एच.47 ए.एस.9548) हा डंपर मराठी शाळेत वाळू खाली करून रिकामा भरधाव वेगात येत असताना या डंपरनेे बशीरशहा यांना धडक देऊन चिरडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

घटनास्थळी नागरिकांची एकच गर्दी जमा झाली. एमआयडीसी पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी यांना घटना कळताच त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्या ठिकाणी डंपर ताब्यात घेऊन तो पोलीस स्टेशनला जमा करण्यात आला. वृद्धाचा मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आला आहे. रुग्णालयात मयत बशीरशहा यांच्या नातेवाईकांनी एकच आक्रोश केला.




