चाळीसगाव तालुका हळहळला : दाम्पत्याने मृत्यूलाही सोबत कवटाळले
दाम्पत्याची गळफास घेत आत्महत्या : दोघे मुले झाली पोरकी
Chalisgaon Taluka Mourns : Couple Embraces Death Together चाळीसगाव (28 मार्च 2026) : आयुष्यभर एकमेकांची सुख-दुखाःत साथ देण्याचे वचन निभावणार्या चाळीसगाव तालुक्यातील दाम्पत्याने कुठल्यातरी कारणाने सोबतच गळफास घेत आत्महत्या केली. या घटनेने समाजमन हळहळले आहे. चाळीसगाव तालुक्यातील शिवापूर येथे पती-पत्नीने शेतातच दोरीच्या सहाय्याने गळफास घेतला. भगवान पोपट जाधव (38) व आशाबाई भगवान जाधव (27) अशी मृतांची नावे आहेत
आत्महत्येचे कारण अस्पष्ट
दोघेही पती-पत्नीने आपल्या शेतात एकाच झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे संपूर्ण परिसर हा हादरून गेला. दोघही मुलं बाहेर असताना दोघेही पती-पत्नीच्या मनात नेमके वादळ काय सुरू होते? याची लेकरांनाही कल्पना नव्हती. दोघांच्याही आत्महत्यांनी दोघं मुलं पोरके झाल्याने मन हेलवणारी करणारी घटना घडली

एकाच दोरीने घेतला गळफास
दोघेही पती-पत्नी हे नेहमीप्रमाणे शिवापूर शिवारातील आपल्या शेतातच वास्तव्यास होते. भगवान जाधव हे शेती सोबतच मजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. शुक्रवारी मध्यरात्री किंवा पहाटेच्या सोमनाथ या दोघांनी घरापासून काही अंतरावर असलेल्या उंबराच्या खाली दुचाकी लावली व दुचाकीवर लढून त्यांनी गळफास लावला. नातेवाईकांना घटना कळताचत त्यांनी दोघांना खाली उतरवून चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी तपासणी करीत मृत घोषित केले.
आत्महत्येचे कारण अस्पष्ट
भगवान जाधव आणि आशाबाई जाधव यांना एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन लहान मुले आहेत. ही दोन्ही मुले शिक्षणासाठी सध्या बाहेरगावी असून दाम्पत्याने हे पाऊल का उचलले? या मागील नेमक्या कारणांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.




