परसाडे येथे वाहनाच्या साईड ग्लासचा धक्का लागल्यावरून एकाला मारहाण


Man Assaulted at Parsade Following a Bump from a Vehicle’s Side Mirror यावल (28 मार्च 2026) : यावल तालुक्यातील परसाडे गावात पांढरी वस्ती भागात सार्वजनिक रस्त्यावर चारचाकी वाहनाच्या साईड ग्लासचा धक्का लागल्याच्या कारणावरून वाद झाला आणि या वादातून एका तरुणाला तिघांनी शिवीगाळ करीत लाकडी काठीने मारून दुखापत केली व तरुणाच्या घरी जाऊन शिवीगाळ करून त्याला ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

काय घडले तरुणासोबत ?
परसाडे, ता.यावल गावातील पांढरी वस्तीच्या सार्वजनिक रोडवरून अशपाक फिरोज तडवी (22) हा तरुण छोटा हत्ती वाहन (क्रमांक एम.एच.47 ई. 0595) घेऊन जात असताना त्याच्या साईड ग्लासचा धक्का लागल्यावरून वाद झाला आणि या वादातून अश्फाक तडवी याला इरफान तुकडू तडवी (रा.डोंगरकठोरा, ता.यावल), अकील शावखा तडवी व इरफान रशीद तडवी (दोघे रा.परसाडे, ता.यावल) यांनी शिविगाळ करून मारहाण केली. काठीने मारून दुखापत केली. व त्याच्या घरी जाऊन शिवीगाळ करून त्याला ठार मारून टाकण्याची धमकी दिली. या प्रकरणी यावल पोलिसात अशपाक तडवी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक अमित तडवी करीत आहे.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !