फैजपूर पोलिस ठाण्यात पोलिसांच्या कामात अडथळा आणणार्‍या दोघांविरोधात गुन्हा


Case Registered at Faizpur Police Station Against Two Individuals for Obstructing Police Duty फैजपूर (28 मार्च 2026) : फैजपूर पोलिस ठाण्यातील ठाणे अंमलदाराच्या कक्षात येत सेवन केलेला गुटखा दोघांनी तेथे थुंकत शहरात दादागिरी वाढल्यानंतर तुम्ही काय करतात ? असे म्हणत उलट पोलिसालाच धक्काबुक्की करण्यात आल्याचा प्रकार घडला. ही घटना शुक्रवारी सकाळी 11.30 वाजता घडली. या प्रकरणी दोन तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण ?
फैजपूर पोलीस ठाण्यात शुक्रवारी भूषण प्रमोद भिरूड (26) व धीरज विजय सोनवणे (25, दोघे रा.फैजपूर) यांनी गुटका सेवत करीत ठाणे अंमलदाराच्या कक्षात प्रवेश केला व त्या ठिकाणी तो गुटखा थुंकला. पोलीस बोलायला गेल्यानंतर त्यांच्याशी त्यांनी वाद घातला. एका पोलिसाची कॉलर पकडून धक्काबुक्की करून त्यांना शिवीगाळ केली आणि शासकीय कामात अडथळा निर्माण केला. याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात हवलदार रुपेश दिगंबर पाटील यांच्या फिर्यादीवरून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास फैजपूर पोलीस ठाण्याच्या प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक मीरा देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रशीद तडवी करीत आहे.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !